|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » तिहेरी तलाक ‘विरोधी’अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी , गुन्हा ठरणार

तिहेरी तलाक ‘विरोधी’अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी , गुन्हा ठरणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मुस्लीम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारं तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत सादर होऊ शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर, या तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसने विरोध केलेल्या गुन्हेगारी या शब्दासह हा अध्यादेश काढण्यात आला आहे. यामुळे तिहेरी तलाक घेतल्यास महिलेचा पती गुन्हेगार ठरणार आहे.

यावर काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली. भाजपने मुस्लमि महिलांना न्याय देण्यासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक आणले नसून, राजकीय फायदा उठविण्यासाठी आणल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.

 

Related posts: