|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अमेरिकेच्या जहाजात ‘ऑरोराचा राजा’ विराजमान

अमेरिकेच्या जहाजात ‘ऑरोराचा राजा’ विराजमान 

मराठी तरुणांकडून स्पेनमध्ये गणेशोत्सव साजरा : खास मुंबईहून मागविली मूर्ती : चौके गावच्या सुपुत्राची माहिती

संतोष गावडे / चौके:

गणपतीची ओढ सातासमुद्रपार असून बाप्पाची प्राणप्रति÷ापणा आता सेलिब्रिटी क्रूझ या अमेरिकन कंपनीच्या कॉन्सलेशन जहाजामध्ये करण्यात आली आहे. सध्या गणेशोत्सवाच्या काळात हे जहाज स्पेनमध्ये असल्याचे मूळ चौके थळकरवाडी येथील रहिवासी व जहाजावर साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत असणाऱया अमेय किशोर गावडे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

अमेरिकन कंपनीचे जहाज इंग्लंड बेस कंपनी पी अँड ओ क्रूझेस या कंपनीने चालविण्यास घेतले आहे. सध्या हे जहाज ‘ऑरोरा’ या नावाने ओळखले जाते. मूळ चौके थळकरवाडी येथील रहिवासी अमेय गावडे हे ऑरोरा जहाजावर साऊंड इंजिनिअर म्हणून काम करीत आहेत. ऑरोरा जहाजावर साजरा केल्या जाणाऱया गणेशोत्सवाबाबत माहिती देताना गावडे म्हणाले, समुद्रात बोटीवर काम करताना मराठी माणसे वेगवेगळय़ा पोस्टवर काम करीत असतात. हे मराठी तरुण गणेशोत्सवानिमित्त एकत्र येतात. उत्साहपूर्ण वातावरणात गणेश मूर्तीच्या आगमनापासून दिनचर्या, पूजा, आरती वेळेत करतात. प्रत्येक मराठी तरुण आपल्या घरातील हा उत्सव आहे, असे समजून गणेशाच्या या उत्साहात सहभागी होतो.

 पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा

13 सप्टेंबर रोजी क्रूझवर गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला. मुंबईहून आणलेल्या गणेश मूर्तीला सर्वांनी वंदन केले आणि ‘ऑरोराचा राजा’ असे  संबोधिले गेले. मूर्तीची प्रति÷ापना केल्यानंतर, पूजा-अर्चा करताना, आरती गाताना सर्व पर्यटक, गणेशभक्त श्री गणेशाला नतमस्तक होतात. इतर पर्यटकांना आरती गातानाचा क्षण आनंदाचा वाटतो. परदेशी पर्यटक टाळ, मृदंग, चकवा, ढोलकी या वाद्यांवर बेधुंद होतात व तल्लीन होऊन जातात. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर करताना त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. त्यांच्या त्या आवाजातील गोडवा निश्चितच समाधान देतो. आजही परदेशी पर्यटक मराठी माणसाचा आदर करतात. मधाळवाणीने ते बोलण्याचा प्रयत्न करतात. दोन-चार वेळा ‘पुढच्या वषी लवकर या’चा घोष मराठी तरुण या पर्यटकांना करण्यास सांगतात. त्यावेळी त्यांच्या मनात गणेशाबद्दल असलेली आत्मियता, प्रेम, जिव्हाळा त्यांच्या चेहऱयावर नकळत दिसत असल्याचे गावडे म्हणाले.

अनाथालय व वृद्धाश्रमाला मदत देणार

क्रूझ शिपमध्ये कामानिमित्त बाहेर असूनही मोठय़ा भक्तीभावाने आम्ही सर्वजण गणेशभक्त आपापल्या कामाच्या वेळा सांभाळून सलग पाच दिवस दुपारी 12.30  व रात्री 11.30 वाजता आरती करतो. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी अर्थातच क्रूझ प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. यावेळी मॉरिशस, इंडोनेशिया येथील कर्मचारी म्हणजेच गणेशभक्तांची उपस्थिती लक्षणीय होती. येथे उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींची उपलब्धता व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी इको पेंडली गणेश हा आमचा मुख्य उद्देश होता. आलेल्या वर्गणीतून किंवा देणगी रक्कम ही मदत म्हणून अनाथालय आणि वृद्धाश्रमास देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले असून ही सर्व सेवा बाप्पानेच आमच्याकडून करून घेतली, असे एक्झिक्युटिव्ह शेफ मनीष यांनी सांगितल्याचे गावडे म्हणाले.