|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » ‘गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ : राहुल गांधी

‘गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / जयपूर :

‘गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है,’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते काल राजस्थानच्या डुंगरपूरमध्ये प्रचारसभेत बोलले. यावेळी राफेल डीलवरुन राहुल गांधींनी मोदींची तुलना थेट चोराशी केली. महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधींच्या या सभेत ‘हर हर महादेव’चा जयघोषही करण्यात आला.

राहुल गांधींनी राजस्थानमध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राफेल डील, विजय मल्ल्या प्रकरण, नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींवर तिखट शब्दात टीका केली. राफेल डीलवरुन राहुल गांधी म्हणाले की, ‘मला देशाचा पंतप्रधान नाही तर चौकीदार बनायचे आहे, असे मोदी म्हणाले होते. पण आज देशाच्या मनात नवा आवाज घुमत आहे, गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है.’

Related posts: