|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाकिस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ : सैन्यप्रमुख रावत

पाकिस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ : सैन्यप्रमुख रावत 

नवी दिल्ली

 भारत-पाकिस्तान यांच्यात होणारी चर्चा रद्द झाल्यानंतर सैन्यप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानने स्वतःचा दहशतवाद थांबवावा, असे म्हटले आहे. आमच्या सरकारचे धोरण अत्यंत स्पष्ट असून दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी अशक्य असल्याचेही रावत यांनी सांगितले. पाकिस्तानी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या क्रौर्याला तोंड देण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे. भारतीयांना होणारी वेदना पाकला देखील जाणवून देण्याची वेळ आली आहे. सैन्याला सातत्याने आधुनिक शस्त्रास्त्रांची गरज राहणार आहे. एका मर्यादेपर्यंतच आम्ही एका शस्त्राचा वापर करू शकतो. नवे तंत्रज्ञान येताच आम्ही ते सैन्याला देऊ इच्छितो, याचकरता शस्त्रखरेदी सुरूच ठेवावी लागणार आहे. सरकारकडून सैन्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. या सहकार्याचा प्रभाव देखील दिसून येत असल्याचे उद्गार रावत यांनी काढले आहेत.

Related posts: