|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पोर्तुगालच्या किनाऱयानजीक सापडले जुन्या जहाजाचे अवशेष

पोर्तुगालच्या किनाऱयानजीक सापडले जुन्या जहाजाचे अवशेष 

लिस्बन

 पुरातत्व तज्ञांनी अनेक शतकांपूर्वी पोर्तुगालच्या किनाऱयानजीक बुडालेल्या एका जहाजाचे अवशेष शोधून काढले आहेत. पोर्तुगालची राजधानी लिस्बननजीक हे अवशेष समुद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 40 फूट खोलीवर होते. भारताकडून लिस्बनच्या दिशेने येत असेलेले हे जहाज 1575 ते 1625 या कालावधीदरम्यान समुद्रात बुडाले असावे असे मानले जातेय. पाणबुडय़ांना जहाजाच्या अवशेषांमध्ये मिरी, चिनी मातीची भांडी आणि अन्य सामग्री मिळाली आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हा या दशकातील सर्वात मोठा शोध असल्याचा दावा मोहिमेशी संबंधित जॉर्ज फ्रीयर यांनी सांगितले. जहाजाच्या अवशेषांमध्ये कांस्य धातूपासून निर्माण करण्यात आलेल्या तोफा देखील आढळल्या आहेत तसेच त्यांच्यावर पोर्तुगालचे चिन्ह आहे. हेच चिन्ह पोर्तुगालच्या वर्तमान ध्वजावर देखील आहे. पाण्याखालील शोधमोहिमेंतर्गत जहाजाचे अवशेष 3 सप्टेंबर रोजी मिळाले होते. या शोधमोहिमेकरता नोवा विद्यापीठ, पोर्तुगाल सरकार तसेच नौदलाचे सहकार्य मिळाल्याचे फ्रीयर यांनी सांगितले.