|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कार उलटल्याने चालक ठार

कार उलटल्याने चालक ठार 

प्रतिनिधी/ मडगाव

नेसाई येथील अब्दूल अली गुलाल अली (52) हा आपली कार घेऊन चांदर येथून गुडीकडे जात असताना आल्मा क्रॉस जवळ त्याचा कारवरील ताबा केला व कार शेतात उलटली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.

जखमी अवस्थेत त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले असता, त्याला मृत्यू आल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा अपघात रविवारी सायंकाळी 4च्या दरम्यान घडला. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलीस पुढील तपास करीत आहे.

 

Related posts: