|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » भविष्य » भविष्य

भविष्य 

पितृपक्ष महालय श्राद्ध पितरांचे स्मरण पूजन व पुनर्जन्म

बुध. दि. 26 सप्टें. ते 2 ऑक्टो. 2018

कोणताही जीव 84 लक्ष योनीतून जात असतो. या कोणत्या प्रकारच्या योनी आहेत ते अनेकांना माहीत नसते. हाती आलेल्या माहितीनुसार मनुष्य योनी चार लाख प्रकारची आहे. प्राण्यांची योनी 30 लाख, पक्ष्यांची योनी 10 लाख, किटक व सरपटणारे प्राणी 11 लाख, वृक्ष, झाडे, वेली यांची योनी 20 लाख तसेच जलचर योनी 9 लाख प्रकारची असते. त्यामुळे जीव कोणकोणत्या प्रकारच्या योनीतून आलेला आहे, अथवा पुढील आयुष्यात कोणत्या योनीत जाणार आहे हे जोतिष शास्त्रावरून समजू शकते पण  त्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अत्यंत खोलवर अभ्यास असणे महत्त्वाचे  आहे. महालय पितृपक्षात पितरांच्या नावाने जे श्राद्ध केले जाते ते त्या त्या योनीतील प्रकारानुसार त्या जीवाला ते अन्न पोचते व त्यांचा आशिर्वाद लाभतो. वाटसऍपवर त्र्यंबकेश्वर येथील विद्वान पुरोहित श्री संदीप पुरुषोत्तम दीक्षित यांना पितृपक्ष महालय पक्षाचे महत्त्व कसे असते हे श्राद्ध कसे करतात याची अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे. ती तीन चार भागात देण्यात येईल हे वाचून श्राद्धकर्म म्हणजे काय व ते कशाला करतात त्याचा हेतू  काय याबद्दल लोकांना चांगली माहिती मिळेल या श्राद्धाचा संबंध पुनर्जन्माशीदेखील आहे. त्याबद्दलचे  सविस्तर लेख पुढे देण्यात येतील. आपले पूर्वज आज कोणत्या योनित गेले असतील अथवा पूर्वजन्मी आपण कोणत्या योनीत असण्याची शक्मयता व त्यासाठी काय करावे याबद्दल बरेच लेख वाचनात येतात त्यातील काही लेख पुढे कधी तरी दिले जातील. आज बुधवारपासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून पुढील 15 दिवस हे पितरांचे दिवस असतात ज्या घरात श्राद्ध कर्मे व्यवस्थित होत असतील तेथे पितरांचे आशीर्वाद मिळून सर्व तऱहेने कल्याण होते. या महिन्यात घराण्यातील सर्व पूर्वजांचे आत्मे भूतलावर असतात. आपले वंशज आपले स्मरण, पूजन  करतात की नाही हे ते अदृश्यरुपाने पहात असतात. त्यामुळे आपल्याला शक्मय होईल तसे श्राद्ध करावे. शक्मयतो भटजींकडून करून घ्यावे, म्हणजे दोष रहात नाहीत. हा काळ सर्व साधारणपणे अशुभ व बाधिक मानला जातो. त्यामुळे या पंधरवडय़ात कोणतीही शुभ कामे करीत नाहीत. वास्तविक हा महिना तसा वाईट नसतो. पितरांच्या कार्याला प्रथम प्राधान्य द्या व नंतर इतर कामाकडे लक्ष द्या, असा संदेश देणारा हा महिना आहे. अपघात, आजार, दुर्घटना, खून, मारामाऱया, दंगली, गोळीबार, विषप्रयोग, आत्महत्या, गळफास यासह अनेक घटनात रोज कुणी ना कुणी जात असतात. त्या सर्व शुभ अशुभ आत्म्यांचा संचार या पंधरवडय़ात  पृथ्वीतलावर असतो. या पितृपक्षात अनोळखी लोकांच्या घरचे अन्न शक्मयतो खाऊ नये, ते बाधण्याची शक्मयता असते. पितृपक्षात बाधिक अन्न घेतल्याने अनेक जणांना प्रखर बाधा झाल्याची व नंतर ते निस्तरताना नाकी नव येतात. अनेकजण नंतर बोलून दाखवित असतात. तुमच्याकडे जर अध्यात्मिक शक्ती नसेल अथवा बाधिक पीडा सहन करण्याची ताकत नसेल तर तुम्ही या  महिन्यात सावध रहाणे चांगले. सर्वपित्री अमावास्येपर्यंतचा काळ सुतकी असतो, त्यामुळे या काळात वाहन वगैरे सांभाळून चालवावे. भांडण तंटे वगैरे पासून दूर रहावे. काही घराण्यातील बाधा अतिशय कडक असतात. त्यामुळे या पितृपक्षात काही जणांचा राग अनावर होण्याची व त्यातून काही तर भयानक दुर्घटना घडण्याची शक्मयता असते. पहिला भाग

मेष

रवि, शनि योगामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. नको त्या व्यक्तिकडून अपमानाचे प्रसंग उद्भवतील. शारीरिक दुखापती होतील. पितृपक्षात शक्मयतो दूरचे प्रभाव टाळा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. मागची काही कोर्ट प्रकरणे असतील तर मार्गस्थ होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवा. संततीच्या बाबतीत त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. अडलेली रक्कम वसूल होईल.


वृषभ

संततीच्या बाबतीत काही ना काही तक्रारी निर्माण होतील. त्यामुळे पितृपक्षात घरातील श्राद्धकर्मे निट करा. शुक्र उच्च असल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. ध्यानीमनी नसता व दूर गेलेल्या व्यक्तिंची अचानक भेट होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मानसन्मानाचे योग येतील.


मिथुन

शुक्र, चंद्राचा शुभयोग अनेक कामात मोठे यश मिळवून देईल. मनातील आशा आकांक्षा पूर्ण होतील. पण रवि, शनि योगामुळे पडझड, अपघात, वास्तुदुर्घटना, कोर्ट प्रकरणाचा त्रास यामुळे मनस्ताप जाणवेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारातून थोडा बहुत लाभ होईल. नोकरीत व इंटरव्हय़ूत मनासारखे यश. काही कौटुंबिक जबाबदारी वाढेल.


कर्क

घरगुती सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष द्याल. स्वत:ची वास्तू, वाहन असावे अशी महत्त्वाकांक्षा मनात आणाल. रवि, शनि अशुभ योगामुळे कोणाशी तरी कडाक्मयाचे वादविवाद, भांडण-तंटे उद्भवतील. पूर्वी कोणाची रक्कम घेतलेली असल्यास ती परतफेड करा. निष्कारण वाईटपणा घेऊ नका, अन्यथा पितृपक्षात याचा शाप किंवा तळतळाट मागे लागेल. स्वतंत्र व्यवसाय असणाऱयांना मनासारखे यश.


सिंह

आरोग्य उत्तम राहील. रात्रीपेक्षा दिवसा जे काम हाती घ्याल ते हमखास होईल. मेष, कर्क, धनु, मीन या राशींशी केलेले कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. महत्त्वाच्या मौल्यवान वस्तू, सोने, चांदी यांची नीट काळजी घ्या. चोरी होणे, अथवा गहाळ हरविण्याची शक्मयता आहे. इलेक्ट्रीक उपकरणे हाताळताना सावधगिरी बाळगा.


कन्या

कफ व पित्तविकार यांचा त्रास होईल. द्विस्वभाव वृत्ती वाढेल. मित्र, मैत्रीणी व नातेवाईक यांच्याशी वादविवाद टाळा. दूरच्या प्रवासात विशेष काळजी घ्या. शारीरिक इजा, खरचटणे, अपघात यापासून जपावे लागणार आहे. घरादाराच्या काही महत्त्वाच्या बाबतीत शुभ घटना घडतील. कुटुंबातील काही घरगुती  समस्या हळुहळू कमी होऊ लागतील.


तुळ

सर्व कामातील अडचणी दूर होऊन हळूहळू अडलेली कामे होऊन त्यात यश मिळत जाईल. लक्ष्मी व सरस्वती या दोघींचीही कृपा आपल्याला लाभणार आहे. घरातील साफ सफाई करताना, किंवा उंचावर चढताना विशेष काळजी घ्या. पाय अथवा हात घसरून पडण्याचा धोका आहे. नोकरी व्यवसायात व इंटरव्हय़ूत मनासारखे यश.


वृश्चिक

घरदार, इस्टेट या दृष्टीने भाग्यवान ठराल. स्वत:च्या वास्तू निर्माण करण्याची इच्छा पूर्ण होईल. संततीसौख्य मध्यम. आरोग्याच्या बाबतीत काही ना काही तक्रारी निर्माण होत राहतील. अत्यंत जवळच्या मित्र-मैत्रिणींपासून सावध रहा. केव्हा तुमचा  घात करतील याचा नेम नाही. उष्णतेचे विकार व रक्तदोष निर्माण होतील.


धनु

राशीस्वामी गुरु उत्तम स्थितीत असल्याने अचानक मान सन्मान लाभेल. आंतरजातीय प्रेमप्रकरण उद्भवेल. घरातील काही व्यक्तींचा उत्कर्ष होईल. घाईगडबडीत, प्रवासात, चालताना वगैरे हाडांना मार लागणार नाही याची काळजी घ्या. नोकरी व्यवसायात पगार वाढीची शक्मयता. खर्चावर नियंत्रण असू दे. येणी वसुली होतील.


मकर

नोकरीत बदली व बढतीचे योग. कोर्ट कचेऱयांची कामे हळूहळू मार्गस्थ होतील. कानाची काळजी घ्या. तसेच खोकला, संधीवात यासारख्या व्याधींचा त्रास जाणवेल. नवीन  व्यवसायाची कल्पना मनात आणत असाल तर थोरा मोठय़ांच्या सहकार्याने पुढे जा. लांबच्या प्रवासाचे बेत आखाल. मोठी आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या.


कुंभ

मित्र मैत्रिणींचे सहकार्य उत्तम लाभेल. आरोग्याच्या  बाबतीत उचक्मया लागणे,घोटे दुखणे, फ्रॅक्चर होणे, लचक भरणे असे अनुभव येतील. वृषभ, तूळ, मिथुन, कन्या या राशीपासून फायदा होईल. तरुणांनी कुसंगतीपासून जपावे. प्रेमप्रकरणात वादविवाद निर्माण होतील. व्यवसायात नवनवीन संधी निर्माण होतील व ते टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.


मीन

चोरीचा आळ येण्याची शक्मयता आहे. ईशान्येकडील व्यक्तिकडून फायदा होईल. पाठीच्या विकार, उष्माघात, रक्तदाब व अति दगदगीमुळे स्नायुंचे विकार उद्भवतील. नोकरी व्यवसायात मनासारखे वेतन मिळेल. त्यामुळे मन आनंदी राहील. राजकारणापासून थोडे दूरच रहा. शिक्षण, नोकरी, विवाह यात मनासारखे यश. कुटुंबासाठी अचानक काही खर्च उद्भवतील.

Related posts: