|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » सायना-कश्यप विवाहबद्ध होणार

सायना-कश्यप विवाहबद्ध होणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे सर्वांनाच चकित करणारे वृत्त मीडियातून प्रसिद्ध झाले आहे.

सुमारे दशकभराच्या कालावधीपासून त्यांच्यात रिलेशनशिप असून या वर्षाच्या अखेरीस 16 डिसेंबर रोजी ते विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. यावषी ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सायनाने ट्विटरच्या माध्यमातून यशासाठी मार्गदर्शन व प्रेरित केल्याबद्दल कश्यपचे आभार मानले होते. सायनाने आतापर्यंत 20 प्रमुख स्पर्धा जिंकल्या असून त्यात ऑलिम्पिक कांस्य व वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यपदकाचाही समावेश आहे. सायना सध्या सेऊलमध्ये कोरिया ओपन स्पर्धेत खेळत असून तिला पाचवे मानांकन देण्यात आले आहे. 32 वषीय कश्यपने 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानापर्यंत झेप घेत क्रमवारीतील सर्वोच्च स्थान मिळविले होते. पण वारंवार होणाऱया दुखापतीमुळे त्याची क्रमवारीत घसरण होत गेली.

Related posts: