|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जगात मूर्खपणाची एकच जागा म्हणजे काँग्रेस

जगात मूर्खपणाची एकच जागा म्हणजे काँग्रेस 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे टीकास्त्र

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जगात मूर्खपणासाठी केवळ एकच जागा असून ती म्हणजे काँग्रेस पक्ष आहे अशी बोचरी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी माओवादी समर्थकांविरुद्ध केलेल्या कारवाईला सर्वोच न्यायालयाने वैध ठरविले आहे. या निकालावर ते प्रतिक्रिया व्यक्त करत होते.

काँग्रेस पक्षाने या माओवादी समर्थकांची पाठराखण केली होती. पुणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात केलेली कारवाई लोकशाहीचा गळा घोटणारी आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. तथापि सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई योग्य ठरविल्यामुळे काँग्रेसच्या पदरात मूर्खपणा पडला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते सैरभैर झाले असून त्यांनी खोटारडेपणाचा कळस घातला आहे. स्वतःला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने साराच ताळतंत्र सोडल्याची टीका त्यांनी केली आहे.

देशाचे तुकडे करू इच्छिणाऱया गटाशी काँग्रेसने सत्तेसाठी संधान जुळविले आहे. तथापि त्यामुळे काँग्रेसचा कोणताही लाभणार नाही. देशाचे मात्र नुकसान होणार आहे. तथापि  काँग्रेसला याची शुद्ध नाही असा घणाघात त्यांनी केला.

Related posts: