|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नराधम पवार सांगली सिव्हीलमध्ये दाखल

नराधम पवार सांगली सिव्हीलमध्ये दाखल 

प्रतिनिधी/ सांगली

  कुरळप येथील आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला नराधम अरविंद पवार याला रविवारी सायंकाळी सांगलीच्या वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छाती आणि पोटात दुखत असल्याची तक्रार त्याने केल्यानंतर त्याला पोलिसांनी सांगलीत दाखल केले आहे.

 कुरळप येथील मिनाई आश्रम शाळेतील मुलींवर नराधम पवार याने अत्याचार केल्याचे एका निनावी पत्रामुळे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करत त्याचे बिंग फोडले. याप्रकरणी पवारसह आश्रमशाळेतील स्वयंपाकीन मनिषा कांबळेला अटक करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यासह सर्वत्र याचे पडसाद उमटत आहेत. बुधवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने त्याला अटक करण्यात आली आहे.

 सध्या इस्लामपूर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत त्याला ठेवण्यात आले आहे. रविवारी पहाटे पोट आणि छातीत जोरात कळा येऊ लागल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला इस्लामपूर येथील रूग्णालयात दाखल केले. पण, तेथील डॉक्टरांनी त्याला सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केल्यानंतर एक हवालदार आणि एक शिपाई अशा दोघांच्या सुरक्षेतच त्याला शासकीय रूग्णवाहिकेतून रविवारी सायंकाळी वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. सिव्हील हॉस्पिटलमध्ये रात्री उशीरापर्यंत त्याच्या तपासण्या सुरू होत्या. त्यामुळे नेमके त्याच्या पोटात आणि छातीला काय झाले, याबाबत काहीच माहिती समजू शकली नाही.

Related posts: