|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » भारतातील पहिल्या टेस्ट टय़ुब बेबीचा पुण्यात सत्कार, ‘टेस्ट टय़ुब बेबी’ विषयावर परिसंवाद

भारतातील पहिल्या टेस्ट टय़ुब बेबीचा पुण्यात सत्कार, ‘टेस्ट टय़ुब बेबी’ विषयावर परिसंवाद 

पुणे / प्रतिनिधी :

भारतातील पहिली व जगातील दुसरी टेस्ट टय़ुब बेबी दुर्गा तथा कनुप्रिया अग्रवाल हिच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त तिचा पुण्यात सत्कार करण्यात येणार आहे. तसेच यावेळी ‘टेस्ट टय़ुब बेबी-समज व गैरसमज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक रोड येथील डॉ. नितू मांडके बिल्डिंग स्थित इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आयव्हिएफ स्पेशलिस्ट डॉ. साधना खुर्द यांनी दिली.

कार्यक्रम जाहीर करताना डॉ. आदित्य खुर्द, डॉ. वंदना खुर्द, रमेश शहा, डॉ. संजीव खुर्द, विजया बांगड, राधिका कुलकर्णी उपस्थित होते. दुर्गाच्या सत्कार व परिसंवादावेळी दुर्गाचे जनम स्व.प्रो. डॉ. सुभाष मुखर्जी एम्ब्रियोलाqिजस्ट प्रो. सुनित कुमार मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.

परिसंवादात डॉ. बी.एन. चक्रवर्ती हे डॉ. सुभाष मुखर्जी यांचे जीवनावर विचार मांडतील. तर टेस्ट टय़ुब बेबी-आविष्कार विषयावर पुण्याचे डॉ. संजीव खुर्द आणि ‘वंधत्त्वाला सामोरे जाण्याची मानसिकता’ या विषयावर नाशिक येथील डॉ. रणजित जोशी या विषयावर विचार मांडणार आहेत.