|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » राफेल करार हे धाडसी पाऊल : वायूदल प्रमुख

राफेल करार हे धाडसी पाऊल : वायूदल प्रमुख 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राफेल व्यवहारावर काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारला वायूदल प्रमुख बी.एस. धनोआ यांचे समर्थन मिळाले आहे. राफेल लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी केलेला करार हे सरकारने उचललेलं धाडसी पाऊल आहे. राफेल आणि एस-400 यंत्रणेमुळे वायूदलाच्या क्षमतेत मोठी भर पडणार आहे. एस-400 यंत्रणेच्या व्यवहाराला सरकारची मंजुरी मिळताच 24 महिन्यांमध्ये ती प्राप्त होणार असल्याचे विधान त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत झालेल्या करारानंतर देखील विमानांच्या पुरवठय़ात मोठा विलंब झाला आहे. सुखोई-30 च्या पुरवठय़ात 3 वर्षांचा विलंब झाला, तर जग्वार या लढाऊ विमानाकरता एचएएलने 6 वर्षांचा विलंब केला आहे. एलसीएमध्ये 5 वर्षे, मिराज 2000 च्या पुरवठय़ात दोन वर्षांचा विलंब झाल्याचे सांगत वायूदल प्रमुखांनी स्क्वॉड्रन्सच्या घटत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

राफेल शक्तिवर्धक

वायूदल अत्यंत कठिण स्थितीला सामोरे जात होते. काहीतरी घडण्याची प्रतीक्षा करणे हा पहिला, आरपीएफला मागे घेणे किंवा तातडीची खरेदी करणे हेच तीन पर्याय आमच्यासमोर होते. आम्ही तातडीची खरेदी केली असून राफेल व्यवहार आमच्यासाठी शक्तिवर्धकासमान असल्याचे उद्गार धनोआ यांनी काढले आहेत. सरकारने धाडसी पाऊल उचलून 36 राफेल विमाने खरेदी केली. एक उच्चक्षमतेचे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज लढाऊ विमान भारतीय वायूदलाला देण्यात आल्याचे ते म्हणाले.

Related posts: