|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुरेश देवरमनी यांचे यश

सुरेश देवरमनी यांचे यश 

बेळगाव / क्रिडा प्रतिनिधी :

जागतिक ज्ये÷ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय धावणे व गायन स्पर्धेत रानी चन्नम्मानगर येथील धावपट्टू सुरेश लक्ष्मणराव देवरमनी (वय 66) यांनी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. विशेष म्हणजे सुरेश देवरमनी यांनी सलग 3 वर्षे जानपद गीत स्पर्धेत भाग घेऊन तृतीय क्रमांकासह हॅटट्रीक साधली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.