|Monday, March 30, 2020
You are here: Home » मनोरंजन » वेबसीरिजवर आता माहिती-प्रसारण मंत्रालयाचा अंकुश; हायकोर्टाचे निर्देश

वेबसीरिजवर आता माहिती-प्रसारण मंत्रालयाचा अंकुश; हायकोर्टाचे निर्देश 

ऑनलाईन टीम / नागपूर :

वेबसीरिजमधील हिंसक, प्रक्षोभक आणि अश्लील दृश्य आणि भाषेला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश हायकोर्टाने केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिले आहेत. अश्ललिता, हिंसक दृष्य आणि असभ्य संवादांचा भरमार असणाऱया वेबसिरीज भारतीय संस्कृती व नैतिकतेवर घाला घालणाऱया असून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका ऍड. दिव्या गोंटिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती.

नेटफ्लक्सि, ऍमेझाँन प्राइम, हॉटस्टार यासारख्या इंटरनेटवरील खासगी वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱया ‘अन्सेन्सॉर्ड’ वेबसीरिजवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज ताशेरे ओढले. त्यावर सुनावणी देताना हायकोर्टाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, विधी आणि न्याय विभाग तसेच गृहमंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.

वेबसीरिजमधील अश्लील आणि हिंसक दृश्यांना आळा घालण्यासाठी एक प्रि-स्क्रीनिंग कमिटी नेमा. वेबसीरिज आणि जाहिराती ऑनलाइन माध्यमांवर जाण्यापूर्वी तपासून घ्या आणि त्यावर नियंत्रण ठेवा. मालिका भारतीय असो वा आंतरराष्ट्रीय असो, ती कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर थेट प्रदर्शित होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश कोर्टाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिले आहेत. यासंदर्भातली मार्गदर्शक तत्वे जारी करण्याचेही कोर्टाचे निर्देश आहेत. यासंदर्भातल्या कायद्याचा (सिनेमॅटोग्राफ कायदा, इन्डिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन ऍक्ट 1986 आदी) भंग होत असेल तर संबंधितांवर कारवाई करा, असेही कोर्टाने नोटीस पाठवलेल्या सर्व यंत्रणांना सांगितले आहे.

Related posts: