|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि.7 ते 13 ऑक्टोबर 2018

मेष

11 ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. मेष राशीला आठवा गुरु आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. विरोधही होईल. तुमचे पटवून देताना प्रकृतीवर  ताण पडेल. औषध, जेवण, पाणी वेळच्या वेळी घ्या. कुटुंबातून तुम्हाला आधार मिळेल. अहंकार ठेवू नका. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील. धंदा मिळेल. वाद करू नका. परीक्षेसाठी जोरदार तयारी करा. कला, क्रीडा क्षेत्रात कष्ट घेत रहा.  कुलदेवतेची प्रार्थना नवरात्रीत करा.


वृषभ

बुध, हर्षल प्रतियुती होत आहे. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. 11 ऑक्टोबर रोजी गुरु वृश्चिकेत म्हणजे वृषभेच्या सप्तमात प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही योजनांच्याकडे लक्ष पुरवा. तुमचे महत्त्व हळूहळू वाढत जाईल. धंद्यात अडचणी येतील. सांभाळून घ्या. कोर्टकेसमध्ये मार्ग शोधता येईल. संसारातील वाद शांतपणे मिटवा घाई करू नका.  खर्च वाढेल. घरात नाराजी असेल. परीक्षेसाठी अभ्यासात आळस नको.


मिथुन

चंद्र, बुध युती होत आहे. गुरु महाराज वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी सावधपणे निर्णय घ्या. धंद्यात मोठे काम मिळेल. संसारात मुलांची प्रगती होईल. थकबाकी  वसूल करा. शेअर्समध्ये सप्ताहाच्या सुरुवातीला फायदा होईल. नवरात्री उत्सवात देवीची आराधना मनोभावे करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेसाठी जोरदार तयारी करा.


कर्क

सप्ताह खूप महत्त्वाचा ठरू शकतो. धंद्यात मोठी सुधारणा होईल. नोकरीतील तणाव कमी होईल. रागावर नियंत्रण ठेवा. 11 ऑक्टोबर रोजी गुरु वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तुम्हाला गुरुचे चांगले पाठबळ मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात पुढे जाता येईल. चुका सुधारता येतील. नवीन परिचय कला- क्रीडा क्षेत्रात फायदेशीर ठरेल. नवरात्रीत श्री अंबामातेच्या कृपेने चांगल्या घटना घडतील. परीक्षेसाठी तयारी करा. यश मिळेल.


सिंह

सिंह राशीच्या सुखस्थानात म्हणजे वृश्चिक गुरु ग्रह 11 ऑक्टो. रोजी प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी दबाव राहील. निर्णयात गोंधळ होऊ शकतो. धंद्यात वाढ होईल. दुर्लक्ष करू नका. थकबाकी मिळवा. जीवनसाथीमुळे तुमच्या कार्यात मदत करतील. कोर्टकेसमध्ये आशादायक वातावरण राहील. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेसाठी विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. चांगली संगत ठेवावी.


कन्या

रविवार किरकोळ वादाचा प्रसंग निर्माण होईल. सोमवारपासून तुमची कामे सुरळीत पार पडतील. 11 ऑक्टोबर रोजी गुरु महाराज वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तुमच्या पराक्रमात येत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही प्रगती कराल. योजना बनवा, पूर्ण करा. लोकप्रियता मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात  पुरस्कार व पैसा मिळेल. परीक्षेत यश मिळेल. घरात शुभ घटना घडेल.


तुळ

तुला राशीच्या धनस्थानात म्हणजे वृश्चिक राशीत गुरुग्रह प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात चांगली प्रगती होईल. मोठे कंत्राट मिळेल. कर्जाचे काम होईल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात सहनशीलता ठेवा. सोमवार, मंगळवार तुमचा राग वाढेल, असे विरोधक वागतील. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धेत टिकणे कठीण पडेल. परीक्षेसाठी अभ्यासाचा आळस नको.


वृश्चिक

साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तुमच्याच राशीत गुरु ग्रह प्रवेश करीत आहे. गुरुबळ वर्षभर राहील. बुधवार, गुरुवार संसारात तणाव होईल. चिडचिडेपणा करू नका. राजकीय- सामाजिक कार्यात लोकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करू नका. धंद्यात सुधारणा होण्यास  वेळ लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात गैरसमज होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यास पूर्ण करावा. चांगली संगत ठेवावी पोटाची काळजी घ्यावी.


धनु

वृश्चिक राशीत 11 ऑक्टोबर गुरु महाराज प्रवेश करीत आहे. तुम्हाला साडेसाती सुरू आहे. सप्ताहाच्या शेवटी राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. मनावर दडपण येईल. घरात जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. वाटाघाटीत चर्चा करावी लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेत यश मिळेल. कोर्टकेस संपवा. व्यवसायात वाढ होईल. थकबाकी घ्या.


मकर

साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. वृश्चिकेत गुरु ग्रहाचे राश्यान्तर होत आहे. तुमच्या कार्यात गुरुबळ चांगले लागेल. धंद्यात सुधारणा होईल. मेहनत यशस्वी होईल. नोकरी लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजना मार्गी लावता येतील. लोकांच्या गरजेसाठी उपयोगी पडा. तत्परता दाखवा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेत यश मिळेल.


कुंभ

वृश्चिकेत गुरु ग्रहाचे राश्यांतर तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणारे आहे. तुम्ही ठरविलेले कार्य पूर्ण करता येईल. प्रयत्न करा. कामाला जोरात सुरुवात करा. 11 ऑक्टोबर रोजी गुरुग्रह वृश्चिकेत येत आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. सोमवार, मंगळवार रागावर ताबा ठेवा. धंद्यात सुधारणा होऊ शकेल. स्पर्धेत यश सोपे नाही. परीक्षेसाठी जोरात तयारी करा. पुढे जाल.


मीन

तुम्हाला गुरुबळ प्राप्त होईल. वृश्चिकेत गुरु ग्रह 11 ऑक्टोबर रोजी प्रवेश करीत आहे. नवरात्रीच्या पहिल्या व दुसऱया दिवशी तणाव होईल. घरात वाद होईल. सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात काम करीत रहा. संधी मिळेल. धंद्यात फायदा होईल. व्यवस्थित गुंतवणूक करा. परीक्षेत यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात टिकून राहता येईल. चांगली संगत ठेवा.


 

 

 

 

Related posts: