|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » ब्रेक फेल झालेल्या ट्रकची सहा वाहनांना धडक

ब्रेक फेल झालेल्या ट्रकची सहा वाहनांना धडक 

ऑनलाईन टीम / पुणे :

सातऱयाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱया ट्रकची कात्रजच्या नव्या बोगद्याकडून येताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील किमान ८ वाहनांना धडक दिली. त्यात ८ जण जखमी झाले आहेत..जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वडगाव येथील पुलावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत सिंहगड पोलिसांनी सांगितले की, सातऱयाहून नारळ घेऊन जाणाऱया तामिळनाडुतील ट्रकचे उतारावर नवले पुल व वडगाव पुलादरम्यानच्या विश्वास हॉटेलसमोर ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे असलेल्या वाहनांना अक्षरशः चिरडले. त्यामध्ये १ दुचाकी, २ कार, २ रिक्षा आणि एक मिनी ट्रकचा समावेश आहे. या अपघातात २ पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.