|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » स्थलांतरितांना इटलीचा विरोध

स्थलांतरितांना इटलीचा विरोध 

विमानतळांप्रमाणेच बंदरेही बंद राहणार :

वृत्तसंस्था/ रोम 

 स्थलांतरितांना एका चार्टर्ड विमानाने इटलीला पाठविण्याच्या जर्मनीच्या योजनेबद्दल वृत्त प्रकाशित झाल्यावर इटलीने कठोर भूमिका दर्शविली आहे. उजव्या विचारसरणीचे पाईक मानले जाणाऱया गृहमंत्री मातियो साल्विनी यांनी देशातील विमानतळे बंद करण्याची धमकी दिली आहे. आश्रय नाकारलेल्या स्थलांतरितांना चार्टर्ड विमानाद्वारे इटलीला पाठविण्याची योजना जर्मनीने आखल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. =बर्लिन किंवा ब्रुसेल्स यापैकी कोणीही अनधिकृत चार्टर्ड विमानांद्वारे स्थलांतरितांना इटलीला पाठविण्याचा विचार करत असल्यास त्यांना यासाठी विमानतळे उपलब्ध नसल्याचे माहिती असावे असे साल्विनी यांनी ट्विट करत म्हटले आहे. स्थलांतरितांच्या बचाव नौकांना स्वतःच्या बंदरांवर स्थान न देण्याच्या जुन्या निर्णयाचा दाखला देत साल्विनी यांनी बंदरांप्रमाणेच विमानतळे देखील बंद करू असा इशारा दिला आहे.

आश्रय नाकारलेल्या स्थलांतरितांना चार्टर्ड विमानांच्या माध्यमातून इटलीला पाठविणार असल्याचे विधान जर्मन संवाद समिती डीपीएने म्हटले होते. स्थलांतरितांना नेणारे चार्टर्ड विमान सोमवारी रवाना होणार होते तर पुढील विमान 17 ऑक्टोबर रोजी रवाना होईल. स्थलांतरितामंध्ये नायजेरियाच्या नागरिकांचा भरणा असून त्यांनी इटलीमार्गे युरोपीय महासंघात प्रवेश केला होता.

जर्मनीचे स्थलांतर विषयक कार्यालय आश्रय मागणाऱयांना पत्र पाठवत असून कथित डब्लिन नियमांतर्गत त्यांना त्वरित इटलीला पाठविण्याचा इशारा देत असल्याचे समजते. डब्लिन नियमांतर्गत स्थलांतरित हे सर्वात अगोदर पोहोचलेल्या देशाची जबाबदारी ठरतात.

Related posts: