|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » रोनाल्डोची पुरस्कारासाठी सर्वप्रथम शिफारस

रोनाल्डोची पुरस्कारासाठी सर्वप्रथम शिफारस 

वृत्तसंस्था/ पॅरीस

फ्रान्समधील फुटबॉल मासिकातर्फे प्रतिवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची निवड केली जाते. निवड झालेल्या फुटबॉलपटूला बॅलन डी ओर हा पुरस्कार देवून गौरविले जाते.

2018 सालातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या 10 जणांच्या फुटबॉलपटूंच्या यादीत पोर्तुगालचा तसेच युवेंटस् संघाकडून खेळणाऱया ख्रिस्टीयानो रोनाल्डोचा समावेश आहे. रोनाल्डोने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यापूर्वी दोनवेळा मिळविला आहे. अर्जेंटिनाच्या लायोनेल मेसीने हा पुरस्कार दोनवेळा पटकाविला आहे. सर्वोत्तम फुटबॉलपटूची निवड करण्यासाठी क्रीडा पत्रकारांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. 2010 हे 2015 या कालावधीत फिफाच्या सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्काराबरोबरच फिफाने बलून डी ओर पुरस्कार सुरू केला आहे. या पुरस्कारासाठी 10 जणांची यादी जाहीर केली आहे.

सर्जीओ ऍग्युरो (अर्जेंटिना), ऍलीसन बेकर (ब्राझील), गॅरेथ बॅले (वेल्स), करीम बेंझेमा (फ्रान्स), इडेनसन कॅव्हेनी (उरूग्वे), टी. कोर्टीयस (बेल्जियम), ख्रिस्टीयानो रोनाल्डो (पोर्तुगाल), केव्हिन ब्रुने (बेल्जियम), रॉबर्टो फिर्मोनो (ब्राझील), दियागो गॉडीन (उरूग्वे).