|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » किसानपुत्रांच्या शिबीरात ठरणार दुष्काळ, निवडणुकांबद्दलची रणनीती

किसानपुत्रांच्या शिबीरात ठरणार दुष्काळ, निवडणुकांबद्दलची रणनीती 

 

पुणे/ प्रतिनिधी :

किसानपुत्र आंदोलनाचे 5 वे राज्यस्तरीय शिबीर आंबाजोगाई येथे होणार आहे. या शिबीरात दुष्काळ आणि येऊ घातलेल्या निवडणुका या मुद्यांवर किसानपुत्र आपली भूमिका ठरवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय निरनिराळय़ा न्यायालयात याचिका दाखल करणे व 19 मार्चचा उपवास यावरही निर्णय केले जाण्याची शक्यता असल्याने या शिबीराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

किसानपुत्र आंदोलनाचे 5 वे राज्यस्तरीय शिबीर 20, 21 ऑक्टोबर रोजी आंबाजोगाई येथे आद्यकवी स्वामी मुकुंदराज यांच्या समाधी परिसरात निसर्ग रम्य वातावरणात हे शिबीर होणार आहे. पहिला दिवस वैचारिक चर्चेचा आणि दुसरा दिवस रणनीतीवरील चर्चेचा असे शिबिराचे स्वरूप असणार आहे. या शिबिरासाठी शिबिरार्थींना टिपणे दिली जाणार आहेत. महाराष्ट्रातील वीस जिह्यातून सत्तर किसानपुत्र या शिबिरात भाग घेतील.

शिबिरार्थींशी चर्चा करण्यासाठी अमर हबीब, सागर पिलारे, संजय सोनवणी, प्रमोद चुंचुवार, राजीव बसरगेकर, शामसुंदर सोन्नर, अनंत देशपांडे, मकरंद डोईजड, गजानन अमदाबादकर, ईश्वर लिधुरे, मयूर बागुल, राहुल म्हस्के, नितीन राठोड, बरुण मित्रा (दिल्ली), संदीप कडवे (म.प्र.), स्वाती झा (बिहार) उपलब्ध असणार आहेत. या पूर्वी मुंबई, नागपूर, आळंदी व जळगाव येथे शिबिरे झाली आहेत.