|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सर्वेश गुरव याची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

सर्वेश गुरव याची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

क्रीडा व युवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांच्यावतीने सातारा येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. यामध्ये मुलांमध्ये सर्वेश गुरव याने 50 मी, 100 मी बटरफ्लाय व्दितीय,  200 मी बटरफ्लाय तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच 14 वयोगटामध्ये मुलांमध्ये 4 बाय 100 मिडले रिलेमध्ये इचलकरंजी हायस्कूलच्या संघाने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. यातील यशस्वी खेळाडू असे.

सर्वेश गुरव, मानस चाळके, आर्यन गजरे, गुरूराज बरगे. सर्वेश गुरव याची नागपूर येथे होणार्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना गंगाराम बरगे, संदिप पाटील, क्रीडाप्रमुख व्ही.एस.गुरव, डी.वाय.कांबळे, संभाजी बंडगर, यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षक यु.पी.पाटील, मुख्याध्यापिका सौ.व्ही.एच.उपाध्ये यांचे प्रस्साहन लाभले. संस्थेच्या मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे यांनी यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Related posts: