|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मायभूमीत चित्रपट पूर्ण झाल्याचा आनंद

मायभूमीत चित्रपट पूर्ण झाल्याचा आनंद 

प्रतिनिधी /वडूज :

आपल्याच मायभूमीत सावी चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे मायभूमीत चित्रपट पूर्णत्वास गेल्याचा मनःस्वी आनंद होत आहे. असे प्रतिपादन दिग्दर्शक चेतन चव्हाण यांनी केले.

कातरखटाव (ता. खटाव) येथील एनकूळ-खातवळ रस्त्यावर गुरूकृपा मुव्हीज निर्मिती संस्थे अंतर्गत सावी  या मराठी चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. यावेळी निर्माते विजय बागल, मनोज खामकर, सहनिर्माते धनाजी चव्हाण, मेस्वाल, अरूण बर्गे, विक्रम गोडसे, दशरथ गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले की, दुष्काळी भागात ही कलाकारांचा सुकाळ असून योग्य मार्गदर्शनाअभावी भरकटत चाललेल्या कलावंतास दिशा देण्याचे काम आपण करणार आहे.

रमेशराज, जान्हवी पाटील, राज आंधळे यांच्यावर या गीतांचे चित्रीकरण झाले असून चिनी चेतन यांनी कोरिओग्राफी केली आहे. चित्रीकरण पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केल्याने माळरानावर यात्रेचे स्वरूप आले होते.

Related posts: