|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हॉटेल सेल्फी

हॉटेल सेल्फी 

‘हॉटेल सेल्फी’ हे नाव जरा नवीन दिसले म्हणून तिथे जेवायला गेलो. आत प्रवेश करतानाच ‘स्मित हास्य करा, तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहात’ असा अनोळखी मराठीत लिहिलेला फलक दिसला. पूर्वी बंगल्यात वगैरे जाताना फाटकावर ‘कुत्र्यापासून सावध रहा’ असा फलक असे. त्याची जागा आता या सीसीटीव्हीची धमकी देणाऱया फलकाने घेतली आहे. असो.

तर आम्ही आत गेलो. वेटरने “आप कितने लोग हैं?’’ असा प्रश्न विचारल्यावर आणि आम्ही आमची संख्या सांगितल्यावर वेटरने दाखवलेल्या जागेवर आम्ही बसलो. मेन्यूकार्ड मागवले. बराच खल केल्यावर एकदाची ऑर्डर निश्चित झाली आणि आम्ही ती वेटरला सांगितली. हातातल्या टॅब नामे उपकरणावर ती ऑर्डर टाईप करून घेताना वेटरने मला मोबाईल नंबर विचारला. त्या अर्थी मी बिल देणार हे त्याने ओळखले असावे. मी मोबाईल नंबर सांगितल्यावर त्याने विचारले, “आप का व्हॉट्स ऍप का नंबर यहीच है क्मया?’’ मी होकार दिल्यावर आणि पाणी मागितल्यावर तो म्हणाला, “आप सब लोग मेरे तरफ देख के स्माईल करो.’’

“क्मयों? कायकू स्माईल करणे का?’’ आम्ही विचारले.

“आप करो ना स्माईल. फिर आपकू समझ्येगा.’’

आम्ही त्याच्या मुखकमलाकडे बघून स्माईल केले. त्या क्षणी माझ्या खिशातला मोबाईल वाजला. मी खिशातून मोबाईल काढला. व्हॉट्स ऍपचं नोटीफिकेशन दिसत होतं. म्हणून ते उघडलं. आणि अहो आश्चर्यम्.  फोटोमध्ये आम्ही मागितलेले सर्व पदार्थ टेबलवर दिसत होते. आणि आम्ही वेटरकडे बघून हसताना दिसत होतो. माझा चकित चेहरा बघून वेटरने खुलासा केला की इथे येणारी गिऱहाईके खाद्यपदार्थ आल्यावर खूप वेळ त्यांचे फोटो काढत बसतात. तोवर खाद्यपदार्थ गार होतात आणि बेचव लागतात. मग गिऱहाईके आमच्याशी विनाकारण वाद घालतात. म्हणून आमच्या शेठनी इथल्या सीसीटीव्हीला हा प्रोग्राम दिलाय. तुम्ही लोकांनी ऑर्डर दिली आणि मी ती टाईप केली की लगेच टेबलवर ते पदार्थ मांडल्याचे संग्रहित होते. तुम्ही स्माईल केले की फोटोशॉपच्या सहाय्याने तुमचे फोटो आणि हा खाद्यपदार्थांचा फोटो एकत्र डकवून तुम्हाला वर पाठवले जातात.

“झकास आयडिया आहे,’’ मी बोललो.

बिल देताना समजले, त्याने बिलात सेल्फीचे शंभर रुपये ज्यादा लावले होते

Related posts: