|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » #METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला

#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमानीविरोधात दाखल केलेली मानहानीचा दावा करणारी याचिका पतियाळा हाऊस कोर्टाने दाखल करून घेतली. यावर येत्या 31 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी अकबर यांची याचिका दाखल करून घेतली. अकबर यांच्यावतीने वरि÷ वकील गीता लुथरा काम पाहणार आहेत. रमानी यांच्या सोशल मीडियावरील अनेक टिट्वट्सचा दाखला एम. जे. अकबर यांनी दिला आहे. या ट्विट्समुळे समाजातल्या आपल्या दर्जाला तडा गेला आहे, आपलं कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे, असा दावा अकबर यांनी याचिकेत केला आहे. अकबर यांच्या वकील लुथरा म्हणाल्या, ‘प्रिया रमानी यांनी अकबर यांची मानहानी करणारे ट्विट्स केले आहेत. त्यांचं दुसरी ट्विट मानहानी करणार असल्याचे सरळ सरळ दिसते आणि या ट्विटला 1200 लोकांनी लाइक केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमातील लेखांमध्ये हे ट्विट्स वापरण्यात आले आहेत. जोपर्यंत रमानी काही सिद्ध करत नाहीत तोपर्यंत ट्विट्स मानहानी करणारेच आहेत.’ अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर अकबर यांनी बुधवारी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार रमानी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी आज सुरू झाली. पुढील सुनावणी 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे.