|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्स इंडस्ट्रीजने तिसऱयांदा कमावला विक्रमी नफा

रिलायन्स इंडस्ट्रीजने तिसऱयांदा कमावला विक्रमी नफा 

जुलै ते सप्टेंबरमध्ये 9,516 कोटीचा मिळवला नफा : मागील वर्षांपेक्षा नफ्यात 17.4 टक्क्यांची वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत विक्रमी नफा झाला असल्याची नोंद कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली आहे. हा नफा विक्रमी असून 9 हजार 516 कोटी रुपयाचा रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा झाला आहे.

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला 17.4 टक्क्यांची नफ्यात वाढ झाली. तर महसूलात 54.5 वाढ होत जाऊन 1 लाख 56 हजार 291 कोटी रुपयावर पोहोचला आहे. या आकडय़ाची तुलना एप्रिल ते जून या तिमाहीशी  केली असता नफ्यात 0.6 आणि महसूलामध्ये 10.3 टक्क्यांहून जादा नफा कंपनीला झाला असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.

रिटेल व्यवसायात प्री टॅक्स नफा 213 टक्क्यांनी वाढ

पेट्रोकेमिकल्स,रिटेल आणि टेलिकॉम या क्षेत्रात समाधानकारक कंपनीचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे आता पर्यंतच्या तिमाहीची तुलना करता सर्वात जादा नफा रिटेल व्यवसायात झाला असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. प्री-टॅक्समध्ये 213 टक्क्यांनी नफा वाढत जात 1 हजार 392 कोटी पर्यत पेंहोचला आहे. तर महसूलामध्ये दुप्पटहून जादा फायदा झाला असून तो 32 हजार 436 कोटी रुपये इतका राहिला आहे.

जीआरएममध्ये सलग 5 व्या तिमाहीत घट

रिलायन्सचे ग्रॉस रिफायनिंग मार्जिन (जीआरएम) 9.5 डॉलर प्रति बॅरेल राहिले आहे. त्या कारणामुळे जीआरएममध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जामनगर रिफायनरी युनिट दोन सप्ताहात बंद राहिल्याच्या कारणामुळे कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नफ्यात घट झाली असल्याचे नोंदवण्यात आले.