|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी

शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना दसरा मेळाव्यानंतर मनसेने सेनाभवनासमोर पोस्टरबाजी केली आहे. अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असे पोस्टर शिवसेना भवनसमोर लावण्यात आले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळावा कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिराबाबत आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत, तेच प्रश्न आता अयोध्येत जाऊन विचारणार आहे, असेही ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेला अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? थेट प्रश्न केला आहे.