|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी युवतींनी एकत्र यावे- प्रज्ञा पाटील

सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी युवतींनी एकत्र यावे- प्रज्ञा पाटील 

वार्ताहर/ बोरगांव

दैनंदिन जीवनातील प्रश्नांच्या विरोधात लढण्यासाठी युवतींनी संघटित होण्याची गरज आहे. समाज जागरूक करण्यासाठी युवावर्गाने पुढाकार घेतला पाहिजे. तरच समाजातील प्रश्न सुटतील. त्यासाठी युतींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन वाळवा तालुका युवती अध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी केले.

  बोरगांव ता वाळवा येथे युवती राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी युवक राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष देवराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्या शोभा राजेंद्र वाटेगांवकर, विलास शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी विलास शिंदे म्हणाले, युवक-युवती मध्ये संघटनात्मक बांधनी असेल, तर समाजातील युवक वर्गाचे प्रश्न मार्गी लागतील. त्यासाठी सर्वाना बरोबर घेऊन पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तळागाळातील युवकांची एकत्र करून वज्रमुठ बांधली पाहिजे. दरम्यान युवती अध्यक्षांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या शोभा राजेंद्र वाटेगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वाळवा तालुका युवती राष्ट्रवादी सदस्य पदी अमृता वसंत लोंढे यांची यावेळी निवड करण्यात आली.   यावेळी अशोक पाटील, आश्विनी नाईक, धनश्री नाईक, सचिन सलगर, राजेंद्र वाटेगांवकर, श्रीकांत नाईक, निशिकांत पाटील, जावेद पटेल, गौरव लोंढे, उमेश नाईक यांच्यासह राष्ट्रवादी युवक-युवती मोठया संख्येने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक लालासाहेब वाटेगांवकर यांनी केले. आभार अमृता लोंढे यांनी मानले.

Related posts: