|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पॅरिस येथील ईमारतीत सापडला 6 महिन्यांचा छावा

पॅरिस येथील ईमारतीत सापडला 6 महिन्यांचा छावा 

पॅरिस

 फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील उपनगरीय भागातील एका ईमारतीतून सिंहाचा छावा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. 6 महिन्यांच्या मादी जातीच्या छाव्याची 11470 डॉलर्समध्ये (सुमारे 8 लाख 40 हजार रुपये) विक्री करण्याचा प्रयत्न आरोपीने चालविला होता. ईमारतीत राहणाऱया अन्य व्यक्तींकडून याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपीने एका शेजाऱयाच्या घरातील कपाटात आश्रय घेतला होता. पोलिसांना छावा एका मुलाच्या बेडवर मिळाला आहे. संबंधित आरोपीला या अगोदर देखील चोरीप्रकरणी शिक्षा झालेली आहे. छावा वन्यजीव अधिकाऱयांकडे सोपविण्यात आला आहे.

मागील वर्षी देखील पोलिसांनी पॅरिसच्या एका रिकाम्या सदनिकेतून एका छावा हस्तगत केला होता. त्याची स्थिती अत्यंत बिकट असल्याने उपचारानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेच्या एका वन्यजीव उद्यानात सोडण्यात आले होते.