|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » जायकवाडी पाणी प्रश्नी नगर जिल्हा प्रशासन सतर्क

जायकवाडी पाणी प्रश्नी नगर जिल्हा प्रशासन सतर्क 

अहमदनगर / प्रतिनिधी :

जायकवाडीसाठी नगर जिह्यातून सोडण्यात येणाऱया पाण्याबाबत प्रशासन संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्कता बाळगून आहे. मात्र या मुद्या संदर्भातील न्यायालयीन घडामोडी, लोक भावना आणि वरिष्ठांचे निर्देश लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

काल जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, मुळा पाटबंधरे विभागाचे अधीक्षक अभियंता रावसाहेब मोरे, भंडारदराचे अधीक्षक अभियंता किरण देशमुख,महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर जिल्हाधिकाऱयांशी संपर्क केला असता ते म्हणाले की, जायकवाडी पाणी मुद्याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे. या विषयाबाबत काहीजण न्यायालयात गेले आहेत. त्याची सुनावणी 31 ऑक्टोबर रोजी आहे. याबाबत कायदा सुव्यवस्था, लोकभावना, न्यायालयीन प्रक्रिया लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.याबाबत प्रशासन सतर्क असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

दरम्यान या विषयासंदर्भात पुरेशी दक्षता घेण्यात येत आहे. एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपाधीक्षक, पन्नास पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक हजार पोलीस कर्मचारी व होमगार्ड असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी दिमतीला ठेवण्यात आली आहे.

पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर मुळा प्रवरा आणि गोदावरी काठी असलेल्या गावांची बत्ती गुल होणार आहे. नदीतील पाणी जसे जसे पुढे सरकेल तशी तशी टप्प्याटप्प्याने वीज बंद करण्यात येईल आणि पूर्ववत चालू देखील करण्यात येणार आहे.

Related posts: