|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांचे निर्वाण

त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांचे निर्वाण 

प्रतिनिधी /पणजी :

जागतिक कीर्तीचे महान तत्वज्ञ, विचारवंत, कवी, थोर विचारवंत, बुद्ध दर्शनाचे गाढे अभ्यासक आणि आचरणशील बौद्ध तत्वज्ञानाचे जागतिक संस्थापक तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघ या जागतिक संस्थेचे संस्थापक ब्रिटनचे नागरिक आदरणीय उर्गेन संघरक्षित यांचे 30 ऑक्टोबर रोजी लंडन येथे हेरेफोर्ड हॉस्पिटलमध्ये न्युमोनियाच्या आजाराने निर्वाण झाले.

 जगातील त्यांच्या अनुयायांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे म्हणून त्यांच्या पार्थिवावर 10 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या लंडन येथील ‘अधिष्ठान संकुल’ परिसरात बौद्ध परंपरेप्रमाणे संस्कार करण्यात येतील.

निर्वाणसमयी ते 93 वर्षांचे होते आणि त्यांनी आपले तरुणपण आपल्या इंग्लड देशाची सेवा करण्यासाठी दुसऱया महायुद्धात भारतात तंत्रज्ञ म्हणून भाग घेतला होता. याच कालावधीत बौद्ध आचारविचार समजून घेण्यासाठी जगातल्या सर्व बौद्ध पंडितांबरोबर आयुष्य घालविले. बरेचसे आयुष्य त्यांनी भारतात घालविले आहे. बौद्ध विचार, परंपरा आणि संस्कार रुजविण्यासाठी त्यांनी जागतिक स्तरावर ‘वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर’ नावाचे तर भारतात त्यांनी ‘त्रिरत्न बौद्ध महासंघ’ नावाचे संघटन बांधले. त्याद्वारे जगभर लाखो लोकांना देश, जात, धर्म, कर्मकांड यांच्या सीमा भेदून बुद्धांच्या शांती, अहिंसा, प्रज्ञा, मैत्री, करुणा आणि सौहार्दाच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरीत केले.