|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करू आंदोलन करू

राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करू आंदोलन करू 

प्रतिनिधी/ मुंबई

राम मंदिर व्हावे, ही भारतीयांची इच्छा आहे. न्यायालयानेही हिंदूंच्या भावनांचा आदर करावा. पेंद्र सरकारने मंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा; अन्यथा राम मंदिरासाठी 1992 सारखे आंदोलन करायची आमची तयारी आहे, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी दिला. यामुळे भाजप सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

संघाच्या तीन दिवसीय शिबिराची शुक्रवारी सांगता झाली. त्यावेळी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला हा इशारा दिला.

या मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला असतानाच संघानेही कडक इशारा दिल्याने भाजप सरकारची मोठीच पंचाईत झाली आहे. राम मंदिरासाठी वेळ लागतोय, हे वेदनादायी आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून ते न्यायालय न्याय देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. लोकांच्या इच्छेनुसार मंदिर झाले पाहिजे. न्यायालय लोकभावनेचा आदर करुन निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related posts: