|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews » नरेंद्र मोदींनी सुप्रिम कोर्टात कबूल केली चोरी :राहुल गांधींचा दावा

नरेंद्र मोदींनी सुप्रिम कोर्टात कबूल केली चोरी :राहुल गांधींचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राफेल विमान करारप्रकरणी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपत्राद्वारे माहिती सादर केली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप करताना नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टात चोरी कबूल केली, असे म्हटले आहे. तसेच राफेल विमान करारप्रकरणी ’’पिक्चर अभी बाकी है’’ असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वटि करून राफेल विमान करारप्रकरणी पंतप्रधन नरेंद्र मोदींवर निषाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी आपली चोरी कबूल केली आहे. ’’सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात हवाई दलाला न विचारता करारात बदल करण्यात आल्याचे तसेच 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानीं ना खिशात घातल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे.’’असे ट्वटि राहुल गांधी यांनी केले आहे.

 

Related posts: