|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » कथ्थक गुरु रोहिणी भाटे यांना अखंड घुंगरू नादातून आदरांजली

कथ्थक गुरु रोहिणी भाटे यांना अखंड घुंगरू नादातून आदरांजली 

पुणे / प्रतिनिधी :

कथ्थक या नृत्यप्रकारासाठी आयुष्य वेचणाऱया गुरु रोहिणी भाटे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी नादरूप कथ्थक संस्था, महाराष्ट्र कल्चर सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे बुधवारी 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी ‘अखंड घुंगरू नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात बुधवार 14 नोव्हेंबर रोजी टिळक रस्त्यावर शक्ती स्पोर्टस् समोर लीला चेंबर येथे असलेल्या नादरूप संस्थेच्या कार्यालयात सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सलग बारा तास घुंगरू नाद करण्यात येणार आहे. कथ्थक गुरु शमा भाटे, मनीषा साठे, भरतनाटय़म गुरु सुचेता चापेकर व नादरूप संस्थेतील विद्यार्थीनी घुंगरू नाद करणार आहेत.

तर गुरुवार 15 नोव्हेंबर रोजी हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी 9 पासून सायंकाळी 7.30 दरम्यान देशभरातील प्रसिद्ध कथक नर्तक व नृत्यांगना गुरु रोहिणी भाटे यांना नृत्यातून आदरांजली वाहणार आहेत. कथक नृत्यांगना रागिणी महाराज, मनीषा गुल्यानी, नंदिनी मेहता, विध लाल, नर्तक सौविक चक्रवर्ती, अल्पना वाजपेयी, गौरी दिवाकर, स्वाती सिन्हा, अशीमबंधू भट्टाचार्य, धीरेंद्र तिवारी आणि मधु नटराज आपली नृत्यसेवा सादर करणार आहेत.

Related posts: