|Monday, February 17, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

कार्तिक स्वामी दर्शन योग पूर्वार्ध

बुध. दि. 14 ते 20 नोव्हेंबर 2018

‘वक्त से पहले और तकदिर से ज्यादा कुछ नही मिलता…. अशी एक म्हण आहे. तुम्ही कितीही कष्टाळु अथवा हुषार असाल, जगातील सर्व ज्ञान तुम्हाला असेल, लाखो रुपयांची रत्ने वापरत असाल, अथवा सतत देवदेव करत असाल तर पूर्वजन्माची पुण्याई नसेल तर कोठेही यश मिळत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. इंजिनियरिंग मेडिकल अथवा इतर क्षेत्रात पीएचडीपर्यंत शिक्षण घेतलेले उच्च विद्याविभूषित लोक नोकरी व्यवसाय मिळत नाही म्हणून वणवण भटकताना दिसतात. काही दवाखान्यात आठ आठ दिवस एकही पेशंट नसतो, कोटय़वधीच्या इमारती  बांधूनही हवे तसे गिऱहाईक येत नाही. काही जणांच्या हाती साधी सायकलही नसते तर याच्या उलट काहीही शिक्षण नसताना रुप सौंदर्य नसताही पटापट लग्ने होतात, काहीजणांना पैसा मोजायला वेळ नसतो. घरबसल्या नोकऱया चालून येतात. घर, बंगला,गाडी, विमान, प्रवास, परदेश प्रवास यासह सर्व तऱहेचे ऐश्वर्य काही जणांच्या पायाशी लोळत असते. एकाच घरात एखादी व्यक्ती ज्यात हात घालेल त्यात नेत्रदीपक यश मिळवून मालामाल होते, तर त्याच घरातील इतर व्यक्तींना मात्र काहीही यश मिळत नाही. घर,गाडी, विमानप्रवास, श्रीमंती, नावलौकीक, प्रसिद्धी, व्यसन न लागणे, योग्यता नसताना चांगले स्थळ मिळून लग्न होणे,अथवा लायकी नसतानाही मोठय़ा पगाराची नोकरी अथवा अधिकार मिळणे, या गोष्टी पूर्वपुण्याईशिवाय साध्य होत नाहीत. प्रयत्नांशिवाय काहीही मिळणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असले तरीसुद्धा दैवी कृपेशिवाय अंगिकृत कार्यात यश मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही विशिष्ट मुहूर्तावर विशिष्ट पुजा,देवदर्शन, उपास तपास, तीर्थयात्रा, थोरामोठय़ांचे आशीर्वाद, कुलदेवतेची उपासना यासह अनेक उपाय योजना सांगितलेल्या आहेत. आपले प्रयत्न योग्य दिशेने व प्रामाणिकपणे चालू असतील तर देवालाही यशाचे माप देणे भाग पडतेच. ज्यावषी कार्तिक पौर्णिमा व कृत्रिका नक्षत्र, ज्या दिवशी असेल, त्या दिवशी  श्री कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे, म्हणजे आर्थिक स्थिती निश्चित सुधारते असे श्री शिवलीलामृतातील 13 व्या अध्यायात सांगितलेले आहे. प्रयत्नांशिवाय काहीही मिळणार नाही हे बरोबर असले तरी आपल्या प्रयत्नांना देवाचा आशीर्वादही पाहिजेच. उपजिविकेसाठी पैशाची किती गरज आहे हे निराळे सांगण्याची गरज नाही. कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे 10, 15 अतिशय महत्त्वाचे योग आहेत. पण त्यापैकी सर्वात महत्त्वाचा व आर्थिक समृद्धी देणारा योग म्हणजे कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र जिथंपर्यंत आहे,तिथंपर्यंत कार्तिक स्वामीचे दर्शन अवश्य घ्यावे. एक वर्षात आर्थिक स्थिती निश्चित सुधारते असे अनुभव आहेत.पण प्रामाणिक व सचोटीचे प्रयत्नही हवेत. स्वच्छ मार्गाने पैसे कमवायचे मार्ग असतील, त्यांना दैवी कृपेचा अनुभव लवकर येतो. आराम बसून कोणताही देव कधीही काहीही देणार नाही. आपली पूर्वपुण्याई चांगली असेल तर कोटय़ाधीश व लक्षाधीशही होऊ शकाल. 22 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी 5.50 वाजता हा सुवर्णमयी योग सुरूहोत असून शुक्रवारी 23 तारखेला सकाळी 11.09 पर्यंत हा योग आहे. या काळात कार्तिक स्वामीचे फक्त दर्शन घ्यावे. त्या दिवशी दर्शनाला महत्त्व आहे. अभिषेक वगैरे त्या दिवशी शक्मय नसते.

मेष

हितशत्रुंचा त्रास कमी होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बरे राहिल. व्यवसाय क्षेत्रात मनासारखे यश मिळेल. दगदगीमुळे व कामाच्या ताणतणावामुळे प्रकृतीच्या तक्रारी वाढतील. काही वेळा प्रमाणापेक्षा आर्थिक खर्च वाढेल. कोणावरही अतिविश्वास ठेऊ नका. उष्णता विकार, डोळय़ांचे आजार यापासून काळजी घ्या.


वृषभ

व्यवसाय क्षेत्रात धाडसाकडे प्रवृत्ती वाढेल. नातेवाईक व नवीन मित्रमैत्रिणींची गाठभेट होईल.महत्त्वाचे कोणतेही व्यवहार विचारपूर्वक करवेत. तसेच जमीन जुमल्याची कामे मनाप्रमाणे घडतील. प्रवासाचे योग येतील. व्यवसाय क्षेत्रात व नोकरी व्यवसायात काही महत्त्वाच्या जबाबदाऱया वाढतील.


मिथुन

कुटुंबात अचानक वादविवाद वाढतील. नोकरीत अचानक मनाविरुद्ध घटना घडतील. त्यासाठी वादविवाद वाढू देऊ नका. आर्थिक आवक मनासारखी राहिल.  आरोग्याच्या बाबतीत घशांचे व पोटांचे विकार उदभवील. दुसऱयांच्या अंगावर कोणतेही महत्त्वाचे काम लादू नका.


कर्क

व्यवसायात आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. स्थावर, इस्टेट यांची कामे मनासारखी होऊ लागतील. बाहेरील काही सामाजिक जबाबदारी अंगावर घेऊ नका. प्रवासात काळजी घ्या. अचानक कोठून ना कोठून पैसा हाती खेळत राहिल. पैशांचे काही व्यवहार असतील तर ते पूर्ण करा.


सिंह

खाण्यापिण्यावर नियंत्रण व्यवस्थित ठेवल्यास आरोग्य उत्तम रालि. जमीन जुमला,  स्थावर इस्टेटीत काही नव्या कटकटी निर्माण होतील. यापुढे आर्थिक प्राप्ती मनासारखी होत जाईल. नोकरी व्यवसायात बदली बढतीचे योग येतील. अचानक प्रवासाचे योग येतील. या आठवडय़ात अचानक धनप्राप्ती होईल.


कन्या

काहीतरी बारीर सारीक शरीराच्या कुरबुरी सुरू होतील. काही कौटुंबिक कटकटी निर्माण होतील. पण त्यामध्ये वादविवाद वाढू देऊ नका. थोडे नमते घ्या. भागिदारीत व्यवसाय करणार असाल तर तूर्तास पुढे ढकला. नोकरी व्यवसायात व स्वतंत्र व्यवसायात बाहेरील क्यक्तिंचे सहकार्य हळुहळू उत्तम लाभेल.


तुळ

धनस्थानी गुरु अस्त सुरू होईल. आगामी महिनाभर आर्थिक बाबतीत काटकसरीने वागावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक योग काही अडलेल्या व्यवहारात यश मिळेल. वास्तुविषयक कामात यश मिळेल. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना पण जामिनकी अथवा साक्षीपुराव्यामुळे पेचप्रसंग निर्माण होईल.


वृश्चिक

लग्नातील अडचणी दूर होतील. वैवाहिक जीवनात काही महत्त्वाच्या घटना आर्थिक बाबतीत सर्व दृष्टीने जपावे लागेल. प्रवास, धनलाभ व महत्त्वाच्या व्यवहारात यश मिळेल. गुरु अस्तामुळे मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रत्येक कामात विलंब त्यासाठी कामे रखडत ठेवू नका. प्रवासात धोका अथवा वाहन बिघडणे असे अनुभव येतील.


धनु

उद्यापासून गुरु अस्त होत आहे. त्यामुळे काही आर्थिक कामे अडण्याची शक्यता आहे. आरोग्याकडेही लक्ष द्यावे. देवाधर्माच्या बाबतीत चांगले योग अध्यात्मिक शक्ती उत्तम राहील. दूरचे प्रवास घडतील. योग साधनेत चांगले यश. राजकारणात असाल तर खातेपालट होईल. मंत्रिपद मिळण्याचे योग. चित्रपटसृष्टीत घवघवीत यश. तसेच उद्योगपती म्हणून वर याल. आर्थिक बाबतीत काटकसरीने वागा.


मकर

उद्यापासून गुरु अस्तंगत होत असला तरी तो शुभस्थानी असल्याने नोकरी व्यवसायासह सर्व बाबतीत शुभ आहे सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. विवाहासाठी अनुकूल काळ भाग्यवर्धक संतती होण्याची योग. प्रवास, भागीदारी, कोर्टप्रकरणे, याबाबतीतही शुभ फळे मिळतील. आर्थिक बाबतीत चांगले योग. पण तरीही खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुगार, लॉटर, सटा शेअर बाजार यात काळजीपूर्वक गुंतवणूक करा.


कुंभ

दशमस्थानी गुरुचा अस्त होत आहे. नोकरी व्यवसायात म्हणावे तसे उत्साही वातावरण राहणार नाही. पूर्वाजित इस्टेट असेल तर ती मिळण्याची शक्मयता. जुन्या वास्तू घेऊन त्याचा जीर्णोद्धार कराल व ते फायदेशीर राहील. व्यवहारी बुद्धिमत्तेचा वापर केल्यास सर्व कामात चांगले यश डोळय़ाचे विकार कमी होतील.


मीन

अस्तंगत गुरुमुळे मंगल कार्यात अडचणी येतील. स्वभावात लहरीपणा तसेच निरुत्साह जाणवेल. कौटुंबिक समस्या असतील तर त्या वाढवू नका. अचानक आलेले पाहुणे व वाढत्या खर्चामुळे आर्थिक बाबतीत चणचण जाणवेल. दीर्घकाळ बंद असलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल. नोकरी, उद्योग व्यवसायात प्रगती होईल वास्तुसंदर्भातील कोणतेही काम पूर्ण होण्यास अनुकूल काळ.

Related posts: