|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » मधुमेहाच्या रक्तचाचण्या सोप्या करणाऱया उपकरणास यावर्षी अंजली माशेलकर पुरस्कार

मधुमेहाच्या रक्तचाचण्या सोप्या करणाऱया उपकरणास यावर्षी अंजली माशेलकर पुरस्कार 

ऑनलाईन टीम / पुणे :

नावीन्यपूर्ण संशोधनात भारत मागे नाही याची जाणीव करून देणारी व अशा संशोधनाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ‘सहावी नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय) आज बाणेर रस्त्यावरील यशदा येथे पार पडली. या परिषदेत संशोधक डॉ. विनय कुमार यांना यावषीचा ‘अंजनी माशेलकर इन्क्ल्यूजिव्ह इनोव्हेशन अवार्ड’ देऊन गौरविण्यात आले.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी), ‘टाटा इन्स्टटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. ज्ये÷ शास्त्रज्ञ व पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्ये÷ अर्थतज्ञ व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, ‘इंटरनॅशनल लाँन्जािव्हिटी सेंटर, इंडिया’चे (आयएलसी इंडिया) अध्यक्ष जयंत उमराणीकर, ‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबने, ‘आयएलसी इंडिया’च्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदि या वेळी उपस्थित होते. डॉ. कुमार यांनी मधुमेह व्यवस्थापन, मूत्रपिंड निकामी होणे, रक्तक्षय वकुपोषण यासाठी आवश्यक अशा चाचण्या करणा-या उपकरणाचे संशोधन केले आहे. ‘अणुपाथ’ असे या उपकरणाचे नाव असून यामध्ये रक्त व मूत्राच्या एकूण 8 चाचण्या करता येतात. हे उपकरण सहज हाताळण्याजोगे व कुठेही घेऊन जाता येण्याजोगे (पोर्टेबल) असून त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा मोठय़ प्रमाणात होईल. याशिवाय या उपकरणामुळे रुग्णाची रक्तातील साखर आत्ता किती आहे हे पाहण्याबरोबरच मागील दोन आठवडे व मागीलतीन महिने रुग्णाचे मधुमेह व्यवस्थापन कसे होते याचा अहवाल उपलब्ध होतात. टाटा ट्रस्टचे डॉक्टर आणि आरोग्य कर्माचारी याचा उपयोगही करीत आहेत. या उपकरणात एक लाख चाचणी रिपोर्ट्स साठवणे शक्मय आहे. ‘एचबीएवनसी’ या मधुमेहाविषयक चाचणीसाठी अंदाजे रु 600 ते 1000 खर्च येत असताना या उपकरणाच्या माध्यमातून ही चाचणी केल्यास केवळ रुपये 90 ते 100 इतकाच खर्च येतो. अशी माहिती डॉ. विनय कुमार यांनी दिली. या परिषदेसाठी निवड झालेल्या 18 संशोधकांनाही या वेळी गिरीश बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.यावेळी बोलताना बापट म्हणाले की, चांगले काम करणाऱयांना पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट असते त्यामुळे पीआयसी आपल्या या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ परिषदेद्वारे त्यांचे करीत असलेले कौतुक हे वाखाणण्याजोगे आहे. देशात नाविन्यपूर्ण काम करणारे अनेक संशोधक आहेत.त्यांचावर विश्वास दाखवून जर त्यांच्या संशोधनात गुंतवणूक केली तर त्याचा निश्चित फायदा होईल, असे मत यावेळी डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केले.