|Thursday, December 5, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » रोहिंग्याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव, चीन अन् रशियाचा विरोध

रोहिंग्याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव, चीन अन् रशियाचा विरोध 

संयुक्त राष्ट्रसंघ

 संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका समितीने म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या विरोधात एक प्रस्ताव संमत केला आहे. महासभेच्या मानवाधिकार समितीने 142-10 अशा मतांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. म्यानमार, रशिया, चीन, कंबोडिया आणि लाओसने या प्रस्तावाला विरोध केला, तर 10 लाखांहून अधिक रोहिंग्यांना आश्रय देणाऱया बांगलादेशने प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले आहे. प्रस्तावाला डिसेंबरमध्ये 193 सदस्यीय महासभेची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावात रोहिंग्या समुदायावरून म्यानमारच्या सैन्याच्या भूमिकेबद्दल देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  इस्लामिक सहकार्य संघटना, युरोपीय महासंघ आणि कॅनडाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात म्यानमारचे सैन्य अजूनही रोहिंग्यांवर अत्याचार करत असल्याचे म्हटले गेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील म्यानमारचे प्रतिनिधी एच.डी. सुआन यांनी हा प्रस्ताव राजकारणाने प्रेरित, एकतर्फी आणि भेदभाव करणारा असल्याचे म्हटले आहे. सप्टेंबर 2017 पासून आतापर्यंत 7 लाख 23 हजार रोहिंग्यांना बांगलादेशात पलायन करावे लागले आहे.

 

Related posts: