|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » भूतकाळाची संसारावर सावली ‘वर्तुळ’

भूतकाळाची संसारावर सावली ‘वर्तुळ’ 

झी युवा प्रेक्षकांसाठी वर्तुळ ही नवी मालिका सादर करणार आहे. नावाप्रमाणेच ही मालिका आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. तसेच ही मालिका एक पॅमेली सस्पेन्स असून 19 नोव्हेंबरपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  मालिकेचं कथानक अगदी रंजक असून ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे. जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. जुई गडकरी बऱयाच काळानंतर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुई मीनाक्षीची भूमिका साकारणार आहे. तर अभिजित परांजपे हा कथेचा नायक आहे ज्याची भूमिका विकास पाटील साकारणार आहे. मीनाक्षी आणि अभिजीतची भेट अपघाताने होते. मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या आहेत. तिचा भूतकाळ अशा काही प्रकारे तिच्यासमोर येतो की, मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. अभिजीतसोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मीनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का? हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मीनाक्षीचा भूतकाळ नक्की काय आहे? ती  सगळय़ांपासून काय लपवतेय? याचा उलगडा या मालिकेत होणार आहे.