|Thursday, September 19, 2019
You are here: Home » उद्योग » ध्येय-धोरणा संदर्भातील ट्रायचे बैठक

ध्येय-धोरणा संदर्भातील ट्रायचे बैठक 

2019 साठीच्या नवीन नियमावली करिता बैठकीचे आयोजन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या भारतासह विदेशातही टेलिकॉम क्षेत्रात सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहेत. यासाठी नवीन टेलिकॉम कंपन्या ग्राहक संख्या आणि येत्या काळात कोणत्या समस्या व बदलाना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे यांचा   एकत्रित आढावा घेण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक मंडळ(ट्राय) यांच्या मार्फत 2019ची ध्येय धोरणांवर चर्चा घडवून आणण्यासाठी डिसेंबर 2018 ला बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती ट्रायचे चेअरमन आर.एस. शर्मा यांनी दिली आहे.

प्रसारण आणि केबल सेवा याच्या करिता नवीन नियमा लागु करण्यासाठीची रुप रेशा तयार करण्यावर सखोल चर्चा घडवून आणली जाणार आहे. तर टेलकॉम क्षेत्रातील महत्वपुर्ण बदलांना सामोरे जाताना खासगी आणि इतर क्षेत्रातील होणाऱया बदलांचा विचार या बैठकित करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण शर्मा यांनी दिले आहे.

या चर्चेत दूरसंचार क्षेत्रातील कार्यरत असणारे इतर घटक यात सहभागी होणार आहेत. उदा : दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारे शेअरधारक यात सहभाग घेण्यासाठीची परवानगी त्यांना देण्यात आल्याचे ट्राय विभागाकडून सांगण्यात आले आहे.