|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » इतिहास संशोधक के. एन. देसाई यांना समाजरत्न गौरव पुरस्कार

इतिहास संशोधक के. एन. देसाई यांना समाजरत्न गौरव पुरस्कार 

प्रतिनिधी/ कराड

मलकापूर (ता. कराड) येथील मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने समाजात वैशिष्टय़पूर्ण कार्य करुन योगदान देणाऱया व्यक्तिंचा गौरव म्हणून शिवचरित्र अभ्यासक व इतिहास संशोधक के. एन. देसाई यांना समाजरत्न गौरव पुरस्काराचे वितरण आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अविनाश मोहिते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, तेजस शिंदे, संतोष पाटील, अमित पाटील, प्रल्हाद देशमुख, विक्रमसिंह पाटील, संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध सामाजिक उपक्रमात सहभाग

 शिवचरित्र अभ्यासक व इतिहास संशोधक के. एन. देसाई यांनी 1974 पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील 387 किल्ले पायी प्रवास करुन पाहिले, अभ्यासले, शेकडो विद्यार्थ्यांना दाखविले. दुर्ग भ्रमंतीच्या 9 लेखमाला प्रकाशित केल्या. वारकरी सांप्रदाय व व्यसनमुक्त युवक संघाचे कार्य गेली 22 वर्षे करीत आहेत. शिवाजी विद्यालय कराड, मसूर, किवळ, काले, घारेवाडी, वडगाव हवेली येथे शेकडो वृक्ष लावले आहेत.

गेली वीस वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारी

घारेवाडी येथे शिवम् प्रतिष्ठान मार्फत आयोजित केल्या जाणाऱया बालसंस्कार शिबिरामध्ये स्थापनेपासून गेली 20 वर्षे शौर्यकथा, पक्षीनिरीक्षण, सुंदर अक्षर, ट्रेकिंग याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. व्यसनमुक्त युवक संघामार्फत प्रत्येक वर्षी आयोजित केल्या जाणाऱया युवक प्रतापी संस्कार सोहळ्यामध्ये किल्ले व ऐतिहासिक स्थळांची माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहेत. किल्ल्यावर मोफत दुर्गसंमेलनाचे आयोजन करीत आहेत. काले येथे 1978 साली सम्राट गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. त्यामध्ये विविध सामाजिक विषयाची सजावट करुन समाज प्रबोधन केले. शिवराज्याभिषेक बालनाटय़ 150 बाल कलाकारांच्या संचात सादर केले. आग्रा ते राजगड हा 1600 किमी पायी प्रवास केला. त्यावर आग्रा ते राजगड हे पुस्तक लिहिले. गेली वीस वर्षे आळंदी ते पंढरपूर वारी पायी करीत आहेत. त्यावर संत संग देई सदा हा ग्रंथ लिहिला आहे.

Related posts: