|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्रीपदासाठी ढवळीकर असक्षम

मुख्यमंत्रीपदासाठी ढवळीकर असक्षम 

थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा दावा

प्रतिनिधी/ म्हापसा

मगोच्या गाभा समितीचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे साबांखामंत्री सदिन ढवळीकर यांच्याकडे द्यावीत, असे म्हटले असले तरी त्या पदासाठी मंत्री ढवळीकर सक्षम नाहीत, असा दावा थिवीचे आमदार नीळकंठ हर्ळणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मंत्री ढवळीकर यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षानेच घेतला आहे.  गेल्या सात वर्षापासून त्यांच्याकडेच तिचतिच खाती आहेत. मात्र त्यांच्याकडून विकास शुन्य आहे, असे हळर्णकर म्हणाले.

 2012 साली थिवी मतदारसंघात पाण्याच्या भल्यामोठय़ा टाक्या उभारल्या. आजही त्या पाण्याअभावी तशाच पडून आहेत. मग ढवळीकर यांना सक्षम कसे म्हणावे. आज त्यांनी व त्यांच्या खात्याने बार्देश तालुक्याला वेठीस धरले आहे. चतुर्थी, दिवाळीत पाणी नाही. आता नाताळमध्येही तिच परिस्थिती होण्याची शक्यता आहे, असे हळर्णकर सांगितले.

गेल्या सहा महिन्यात मोले व काणकोण आरटीओ चेक नाक्यावर अधिकाऱयांना पैसे घेताना दक्षता विभागाने पकडले आहे. सहा महिन्यातच दोन अधिकारी पकडले जातात याची चौकशी होणे आवश्यक आहे. मंत्री ढवळीकर यांच्या खात्यातच इतका भ्रष्टाचार होत असेल तर ते मुख्यमंत्री झाल्यास राज्य कुठल्या थराला पोचेल हे सांगता येणार नाही. तसेच आज मुख्यमंत्री आजारी असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गेली दोन वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याने थिवी मतदारसंघाला न्याय दिला नाही, असे ते म्हणाले.

मध्यवर्ती निवडणूका होण्याचे संकेत

पूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्र्यांना पत्र पाठवून सरकार बरखास्त केले. त्यावेळी केंद्रातही त्यांचेच सरकार होते. आजही तिच परिस्थिती आहे. भाजपला कायद्याच्या बाहेर जाण्याची सवय आहे. त्यामुळे मधवर्ती निवडणूका होऊ शकतात, असे संकेत हळर्णकर यांनी दिले.

Related posts: