|Monday, February 17, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

कार्तिकस्वामी दर्शन योग

उत्तरार्ध

बुध. दि. 21 ते 27 नोव्हेंबर 2018

कार्तिक स्वामी कोण आहेत? त्यांच्या दर्शनाने आम्हाला लाखो रुपये मिळतील का? खरोखरच आमची प्रगती होईल का? यासह अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. आराम बसून देवदेव करीत बसलात तर दे दे म्हणायची वेळ येते. कोणताही देव फुकटाफुकटी तुम्हाला काहीही देणार नाही. कष्ट हे करावेच लागतात. पण कष्ट करूनही जर तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल, लक्ष्मी तुमच्यापासून  दूर जात असेल तर कुठेतरी काही तरी चुकत आहे, अथवा पूर्वजन्माची पुण्याई संपत आलेली आहे, असे समजावे. आपल्या कष्टाला  योग्य न्याय मिळावा, लक्ष्मीची कृपा रहावी, देवाचा आशीर्वाद लाभावा, यासाठीच कार्तिक महिन्यातील पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्र जोपर्यत आहे, तोपर्यंत कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे व आपली आर्थिक स्थिती सुधारण्याविषयी प्रार्थना करावी. नोकरी मिळत नाही, व्यवसाय सरळ चालत नाहीत, कुठेतरी आशेने गुंतवलेल्या ठेवी बुडतात, कर्जदारांचा तगादा, लग्नातील अडथळे, आरोग्य वारंवार बिघडणे, शत्रुपीडा, कोर्टकचेऱयांची प्रकरणे, नोकरीत  राजकारणामुळे नोकरी सोडण्याचा प्रसंग येणे, पती-पत्नीत संघर्ष व घटस्फोटापर्यंत जात असलेली  प्रकरणे, मुलाबाळांचे अभ्यासात लक्ष न लागणे, माता-भगिनीवर कुणा पाप्याची वाईट नजर, घरमालक, भाडेकरू संघर्ष, करणीबाधेसारखे अघोरी प्रकार यासह अनेक संकटावर कार्तिकस्वामीचे दर्शन अत्यंत लाभदायक आहे. गणेश व कार्तिकेय हे दोन्ही भावंडे आहेत. कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे जमत नसेल अथवा कार्तिकस्वामींची मंदिरे नसतील, त्यानी कार्तिकस्वामीचे 108 वेळा स्तोत्र वाचावे अथवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्रातील कार्तिकस्वामींची 28 नावे 108 वेळा जपावीत. बेळगावात किर्लोस्कर रोडवरील नवग्रह मंदिर, भोई गल्ली तसेच दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, हलशी येथील नरसिंह मंदिर, कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिर व प्रयागतीर्थ, सातारा कोरेगाव, पुण्यातील पर्वती, तसेच कोकणात रत्नागिरी, चिपळूण व गोव्यातील मडगाव, रावणफोंड येथे कार्तिक स्वामीच्या मूर्ती आहे. याशिवाय इतरत्रही असतील. कार्तिक स्वामीवर मुळातच अग्नि व लक्ष्मीची कृपा असल्याने कुबेराचे ऐश्वर्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्रावर त्यांचे मनोभावे फक्त दर्शन घ्यावे व स्तोत्र अथवा मंत्रवाचन करावे. देव काही मागत नसतो. इथे श्रद्धेला महत्त्व आहे. देवाच्या नावाखाली काहीजण देवाचे व्यापारीकरण सुरू करतात. देवाला अमुक द्या, तमुक द्या, सोने द्या, अभिषेक करतो, पैसे द्या असे काहीजण सांगतील. त्याला बळी पडू नये. कार्तिक स्वामी हे जितके दयाळू दैवत आहे, तितकेच ते अत्यंत कडकही आहे. कोणत्याही प्रकारची नाटके या देवाला आवडत नाहीत. त्याचे नंतर जबर फटके बसतात. जर अभिषेक करणार असाल तर तो तुमच्यासमोर होणे आवश्यक आहे. त्या दिवशी गर्दी होण्याची  शक्मयता असल्याने  आभिषेक वगैरे शक्मयच नसते, पुढे केव्हा तरी शांतपणे अभिषेक करावा. स्त्रिया मुलेबाळे यासह सर्वांनी कार्तिकस्वामीचे दर्शन अवश्य घ्यावे. वर्षभरातील आपला अनुभव पहावा. गेल्या 15, 20 वर्षांपासून कार्तिकस्वामी दर्शनाविषयी खजानात माहिती दिली जात आहे. दि. 22 नोव्हेंबरला सायंकाळी 5.50 पासून 23 च्या सकाळी 11.09 पर्यंत हा दर्शनाचा योग आहे. स्वत: दर्शन घ्या, तसेच इतरांनाही सांगा, त्यांचेही कल्याण होईल.

मेष

शुक्राचे वास्तव्य आर्थिक स्थिती सुधारण्यास उत्तम आहे. सर्व कामात दैवाची साथ मिळेल. कल्याणकारी कार्तिक पौर्णिमेस काही शुभ कार्याची सुरुवात होईल. काम कितीही अवघड असले तरी त्यात यश मिळू शकेल. कौटुंबिक स्थिती चांगली राहील. जाहिराती पाहून गोळय़ा वगैरे घेण्याची सवय असेल तर ती सोडा.


वृषभ

कार्तिक पौर्णिमा तुमच्या राशीत होत आहे. कार्तिक स्वामीचे दर्शन घ्या. आर्थिक स्थिती सुधारेल. राशीस्वामी शुक्र आनंदी आहे. त्यामुळे अडलेल बरीच कामे होऊ लागतील. काही कारणाने दुरावलेली मित्रमंडळी व नातेवाईक पुन्हा जवळ येऊ लागतील. गैरसमज निवळतील. हाती पैसा येऊ लागेल.


मिथुन

कार्तिक पौर्णिमा देवाधर्माच्या बाबतीत चांगली फळे देईल. बदनामी, गुप्तशत्रुत्व, करणीबाधा, आर्थिक अडचणी वगैरेचा त्रास असेल तर येत्या पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन घ्या. अथवा शुक्राचे पाठबळ असल्याने रहाती जागा, वास्तू, शिक्षण व नोकरी व्यवसायातील अडलेली कामे होऊ लागतील. रद्द झालेली बढती पुन्हा परत मिळेल.


कर्क

कार्तिक पौर्णिमा लाभात होत आहे. अपेक्षित स्थानी बदली होऊ शकेल. धनलाभाची शक्मयता, घरातील व कार्यालयीन वातावरण आनंदी व समाधानी राहील. पौर्णिमेदरम्यान काही महत्त्वाचे फेरबदल अपेक्षित आहेत, जे तुमचे जीवन बदलून टाकतील. शुक्र सर्व बाबतीत फायदेशीर आहे. सर्व कामात यश देणारे ग्रहमान.


सिंह

नियोजन व कार्यक्षमता चांगली असेल. शिस्तबद्ध असाल, जीवनाची गाणिते नीट वेळेवर सोडवीत असाल तर हा आठवडा तुम्हाला फार मोठे यश देऊ शकेल. पौर्णिमा अतिशय शुभ आहे. राशीस्वामी रवीची शक्ती क्षीण आहे. त्यामुळे काही व्यावहारिक कामे अडण्याची शक्मयता. त्यासाठी कार्तिकस्वामीचे दर्शन घ्या. अनेक समस्यांवर मार्ग निघेल.


कन्या

अनुकूल शुक्रामुळे मंगलकार्यातील अडचणी कमी होतील, पण शनि, मंगळ प्रभावामुळे दगदग व आरोग्याच्या तक्रारी वाढतील. रक्तदोष, पोटाचे विकार, अपेंडिक्स असलेल्यांनी काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनातील बऱयाच समस्या सुटतील. कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन घ्या. त्याचा वर्षभर चांगला अनुभव येईल.


तुळ

आरोग्य विषयक समस्या दूर होतील. बिघडलेले आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. धनस्थानी गुरु व कार्तिक पौर्णिमा तुम्हाला वर्षभर सतत धनलाभ घडवत राहील. राशीस्वामी शुक्र बलवान आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. जागेचे व्यवहार, महत्त्वाच्या वाटाघाटी तसेच मित्रमंडळींच्या बाबतीत ठरवलेले अंदाज, योग्य ठरतील. प्रगतीची जोरदार घोडदौड चालू राहील. वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील.


वृश्चिक

कल्याणकारी कार्तिक पौर्णिमा सप्तमस्थानी होत आहे. भाग्योदय, भरभराट, विवाह व संततीच्या उत्कर्षाच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. नवविवाहितांना संततीची चाहूल लागेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने भाग्यशाली योग. आवडत्या विभागात काम करण्याची संधी प्राप्त होईल. काही अडचणी सतावत असतील तर पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन घ्या.


धनु

कार्तिक पौर्णिमा धनलाभाच्या बाबतीत चांगली आहे. मोठमोठे व्यवहार असतील व त्यात अडचणी जाणवत असल्यास कार्तिक  स्वामींचे स्तोत्र वाचा. दुकान, जागा व रहात्या वास्तू संदर्भातील अडचणी दूर होतील. मूळ नक्षत्र असेल तर जुन्या वास्तुच्या बदल्यात नव्या वस्तू घरी आणाल. वाहन, वास्तू वगैरे होण्याच्या दृष्टीने चांगले योग.


मकर

पंचमस्थानी होणारी कार्तिक पौर्णिमा आरोग्य तसेच नवनव्या व्यवहाराच्या बाबतीत  शुभ फलदायक आहे. सरकारी कामे होऊ लागतील. अंगिकृत कामात चांगले यश मिळेल. शुक्र अनेक दृष्टीने लाभदायक, संतती होण्याची शक्मयता. विवाह कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. मानसिक समाधान चांगले राहील.


कुंभ

जागेच्या व्यवहारात अडथळे, फसवणूक, कौटुंबिक कटकटी, मातापित्यांच्या आरोग्याच्या तक्रारी, घराण्यातील पूर्वार्जित दोष या बाबतीत त्रास जाणवत असेल तर कार्तिक पौर्णिमेला कार्तिकस्वामीचे दर्शन घ्या. वर्षभरात चांगले अनुभव  येतील. महत्त्वाच्या कामात यश. धनलाभाच्या संधी येतील. एखाद्या ठिकाणी मोठी रक्कम अडकलेली असेल तर ती परत मिळेल.


मीन

शुभकार्यात चांगले यश मिळवाल. आर्थिकदृष्टय़ा शुभयोग, जुनी वसूली होईल. पौर्णिमेचा शुभयोगावर नोकरी व्यवसायात शुभ घटना. येत्या पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊन त्यांचे स्तोत्र वाचा. नाती सुधारतील. शेजारी व नातेवाईक चांगले वागू लागतील. पौर्णिमा शुभ असल्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक समस्या मिटतील. आर्थिक सुधारणा होऊ लागतील.

Related posts: