|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काँग्रेसला अली मुबारक, आम्हाला बजरंग बली

काँग्रेसला अली मुबारक, आम्हाला बजरंग बली 

उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्यप्रदेशात प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस नेते कमलनाथ यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसला केवळ मुस्लिमांची मते हवीत असे कमलनाथ यांनी म्हटले होते, त्यांच्या या विधानावरून योगींनी त्यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसला एससी-एसटींची मते नकोत, काँग्रेसला केवळ मुस्लिमांची मते हवीत. कमलनाथ तुम्हाला अली मुबारक, आमच्यासाठी बजरंग बली पुरेसे असल्याचे योगी म्हणाले. अलिकडेच काँग्रेस नेते कमलनाथ यांची एक कथित चित्रफित प्रसारित केली होती. मला एससी-एसटींची मते नकोत, एससी-एसटींची मते भाजपला देखील मिळतात. आम्हाला मुस्लिमांची 90 टक्के मते हवी आहेत. जर याहून कमी मते प्राप्त झाल्यास आम्हाला नुकसान होईल असे कमलनाथ यांना म्हणत असल्याचे दिसून येते. मुस्लीम काँग्रेसची मतपेढी असल्याचे वादग्रस्त विधानही त्यांनी केल्याचे दिसून येते.

Related posts: