|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रविण गलांडे यांचे गीत गायन स्पर्धेत यश

प्रविण गलांडे यांचे गीत गायन स्पर्धेत यश 

प्रतिनिधी /इचलकरंजी :

येथील बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे संगीत शिक्षक प्रविण गलांडे यांनी जिल्हास्तरीय कॅरोओके गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या 50 व्या वाढदिवानिमित्त आमदार राजेशजी क्षीरसागर फौंडेशनच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

     तसेच प्रशालेतील सेवक संतोष लकडे यांनीही स्पर्धेमध्ये सहभाग घेत प्रथम फेरीत यश संपादन केले. प्रविण लगांडे हे विद्यालयातील विद्यार्थ्यांना गायन कलेचे उत्कृष्ट अध्यापन करतात. तसेच विविध गायन स्पर्धांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी बक्षीसे पटकाविली आहेत. मुख्याध्यापिका एम. एस. रावळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे, सेपेटरी महेश कोळीकाल, उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.