|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देशसेवा केलेल्या माजी सैनिकांचा त्याग अतुलनीय!

देशसेवा केलेल्या माजी सैनिकांचा त्याग अतुलनीय! 

जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचे प्रतिपादन : माजगाव येथे माजी सैनिकांचा स्नेहमिलन मेळावा : 

माजी सैनिक, त्यांच्या पालकांचा सत्कार

आपले कुटुंब गाव सोडून देशाच्या सीमेवर खडतर परिस्थितीत देशसेवा केलेल्या माजी सैनिकांच्या त्यागाची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे 

माजी सैनिकांचे समाजात वरचे स्थान 

दिलीप पांढरपट्टे 

जिल्हाधिकारी

वार्ताहर / ओटवणे:

आपले कुटुंब गाव सोडून देशाच्या सीमेवर खडतर परिस्थितीत देशसेवा केलेल्या माजी सैनिकांच्या त्यागाची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांना आपल्या देशसेवेचा अभिमान असून यामागे त्यांची उदात्त भावना आहे. त्यामुळे माजी सैनिकांचे समाजात वरचे स्थान असून प्रत्येकाने माजी सैनिकांना मान सन्मान देण्याची गरज आहे. तरच सैनिकी परंपरा टिकून आपल्या देशाची सुरक्षितता अबाधित राहणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

प्रादेशिक सेना मराठा एलआयमधील 109 इन्फट्री बटालियनच्या निवृत्त अधिकारी सैनिकांच्या माजगाव येथील अलकनंदा सभागृहात रविवारी झालेल्या 109 परिवार स्नेहमिलन मेळाव्यात पांढरपट्टे बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवा मुक्ती संग्रामाचे स्वातंत्र्यसैनिक वसंत केसरकर, वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी, माजगावच्या वीरपत्नी तिलोत्तमा दीपक सावंत, 109 परिवारचे संस्थापक अध्यक्ष चंद्रहार पाटील, खजिनदार हणमंत चौगले, सेक्रेटरी संजय खाडे, उपाध्यक्ष पांडुरंग सरगर, निमंत्रक महादेव माने, सहसचिव रत्नाकर तिराळे, कोल्हापूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अरुणकुमार भोसले, भांडुपचे रवींद्र राणे, जिल्हा सैनिक संघाचे सचिव दीपक आरोसकर, जिल्हाप्रमुख किशोर साळुंखे (पुणे), हंबीर घाटगे (सातारा), गणेश शिंदे (सांगली), दीपक चव्हाण (कोल्हापूर), तुकाराम ढोबळ (सोलापूर), उत्तरेश्वर भोसले (मराठवाडा), जॅक डिसोजा (मुंबई), आनंदा मेटकर, आनंदराव पाटील, रमेश पाटील, रंगराव घोरडे, गणपत निकम (बेळगाव), हरिश्चंद्र सुद्रिक (कोकण), भरत गावडे, दीपक परब, डॉ. लवू सावंत, सुभाष सावंत उपस्थित होते.

माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव

वसंत केसरकर यांनी माजी सैनिकांच्या महान कार्याचा गौरव करताना त्यांच्या खडतर परिस्थितीतील देशसेवेमुळे आपली पर्यायाने देशाची सुरक्षितता अबाधित राहते. त्यामुळे त्यांच्याबाबत प्रत्येकाच्या हृदयात आदर असणे गरजेचे आहे. तसेच देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसह माजी सैनिकांवर अन्याय झाल्यास अथवा प्रसंग आल्यास सर्व माजी सैनिकांनी त्यांच्या पाठिशी राहवे, असे आवाहन केले. चंद्रहार पाटील यांनी 109 परिवारात महाराष्ट्रासह बेळगावमधील मराठी इन्फट्री बटालियन सर्व निवृत्त अधिकारी सैनिकांचा समावेश असून या सर्वांना संघटित करण्यासह जुन्या देशसेवेतील आठवणींना उजाळा देण्यासाठीच हा स्नेहमिलन मेळावा आयोजित केल्याचे सांगितले. गेल्या वर्षी कोल्हापूर येथे पहिला स्नेहमेळावा झाला होता. तर दुसरा स्नेहमेळावा रविवारी सावंतवाडीत घेण्यात आला.

माजी सैनिक, त्यांच्या पालकांचा सत्कार

वीरपत्नी तिलोत्तमा सावंत, आबा कोटकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार झाला. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या राजेश तेजम, राजेश गावकर, राजेश परब, अमोल तळवणेकर, दीपक आरोसकर, भगवान सोईल, संदीप कोरगावकर, सृपल राणे, सतीश राणे यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. सुभेदार मेजर अरुण शिर्के सौ. अनिता शिर्के, कमांडर आयुब मुलाणी, शशिकांत कोळी, मारुती गुरव, महिंद्र अकले, गोरख कराडे, संभाजीराव चौगले, संदीप कामटीकर, हरी पाटील, शहाजी पाटील, कॅप्टन शंकर तांबेकर, प्रभाकर कुंभार, विजय कदम, मारुती कोगनुळकर, पांडुरंग चौगुले, संजय शिंदे, अशोक पवार, विठ्ठल कुलकर्णी, आकाराम सुभेदार, एकनाथ पाटील, नामदेव जगताप आदींचाही गौरव करण्यात आला.

सैन्य सेवेतील आठवणींना उजाळा

मेळाव्याला 109 परिवाराचे महाराष्ट्र बेळगावातील सुमारे 500 माजी अधिकारी सैनिक कुटुंबियांसह उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोक्याला मराठमोळे फेटे बांधण्यात आल्याने उत्साहाचे वातावरण होते. अनेकांनी आपल्या सेवेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक दीपक परब, सूत्रसंचालन दीपक आरोसकर, परिचय भरत गावडे यांनी, तर आभार लवू सावंत यांनी मानले.

Related posts: