|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » मितालीला वगळण्याचा ‘तो’ निर्णय योग्यच : डायना एडल्जी

मितालीला वगळण्याचा ‘तो’ निर्णय योग्यच : डायना एडल्जी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत मिताली राजला वगळण्याच्या निर्णयाचे प्रशासक समिती सदस्य व माजी भारतीय कर्णधार डायना एडल्जी यांनी समर्थन केले. संघव्यवस्थापनाच्या निर्णयाला केव्हाही आव्हान देता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीतून मितालीला वगळले गेले व त्यानंतर भारतीय संघाला 8 गडय़ांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर त्या निर्णयावर बरीच टीका झाली. या पार्श्वभूमीवर डायना एडल्जी बोलत होत्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी फेरीतील शेवटच्या लढतीत मितालीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. पण, नंतर ती तंदुरुस्त झाली आणि इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीसाठी उपलब्ध होती. या स्पर्धेत बहरातील मितालीने आयर्लंडविरुद्ध 51 तर पाकिस्तानविरुद्ध 56 धावांची शानदार खेळी साकारली होती. त्या पार्श्वभूमीवर तिला संघातून बाहेर ठेवणे वादग्रस्त ठरले.

‘माझ्या मते या निर्णयावर नको तितके वादंग होत आहे. संघव्यवस्थापनाने (कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रशिक्षक रमेश पोवार, उपकर्णधार स्मृती मानधना व निवडकर्त्या सुधा शाह) मागील विजयी संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय उलटला. जर भारताने हा सामना जिंकला असता तर त्या निर्णयावर कोणीच काही बोलले नसते, याची मला खात्री आहे. पुरुष संघातील कृणाल पंडय़ाचे उदाहरण येथे देता येईल. पंडय़ाची पहिल्या टी-20 सामन्यात बरीच धुलाई झाली. पण, तरीही तिसऱया सामन्यात त्याने जोरदार मुसंडी मारली’, असे त्या पुढे म्हणाल्या.

Related posts: