|Sunday, May 26, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » वीवो Y95 च्या खरेदीवर जिओकडून 4 हजाराची ऑफर

वीवो Y95 च्या खरेदीवर जिओकडून 4 हजाराची ऑफर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

वीवोने भारतीय बाजारपेठेत वीवो Y95 लॉन्च केला. वीवोच्या वाय सिरिजमधील हा मिड रेंज स्मार्टफोन असून स्टेरी ब्लॅक आणि नेबुला पर्पल रंगात हा उपलब्ध आहे. वीवो Y95 क्वालकॉम स्नॅपड्रगन 439 ऑक्ट्रा कोर प्रोसेसरवर चालणारा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आणि फिंगर पिंट दिले आहे. येणाऱया दिवसात यामध्ये आणखी बदल झालेले दिसतील. फोनमध्ये 20 एमपी एआय कॅमेरा आणि फुल व्हय़ू डिस्प्ले दिला आहे.

वीवो Y95 ची भारतातील किंमत 16 हजार 990 रुपये असून ऍमेझाँन, फ्लीपकार्ट आणि पेटीएम अशा सर्व सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही दुकानातूनही हा फोन खरेदी करू शकता. वीवो Y95 कंपनीच्या ई-स्टोअर वर देखील मिळेल. हा नवा स्मार्टफोन ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ग्रेटर नोएडाच्या प्लांटमध्ये तयार केले. फोनच्या लाँचिंगवेळी कंपनीने डेबिट कार्ड, पेडिट कार्ड आणि बजाज फायनान्सचा 15 महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआयची ऑफर दिली होती. फोनचा ईएमआय 1 हजार 133 रुपये प्रतिमाह सुरू होतो आहे.

जर तुम्ही वीवो Y95 पेटीएमवरून खरेदी करत आहात तर त्यावर 1,500 रुपयांचे कॅशबॅक कूपन मिळत आहे. रिलायन्स जिओ च्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर 4 हजार किंमतीचा 3TB डेटा मिळणार आहे. फोनची 64 जीबी इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

 

फोनचे स्पेसिफिकेशन

डय़ुयल सेटअप तसेच आर्टिफिशिअल लेंसचा कॅमेरा.

फ्लैशसोबत अपर्चर एफ/2.0 सोबत 13 मेगापिक्सल प्रायमरी आणि अपर्चर एफ/2.4सोबत 2 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर.

सेल्फीसाठी AI फेस ब्यूटी फीचरसोबत 20 MP चा कॅमरा.

6.22 इंच 1520×720 पिक्सल रिझाँल्यूशनचा एचडी प्लस वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले.

बॅक पॅनलला फिंगरपिंट सेंसर

4030 mAh ची बॅटरी

Related posts: