|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » शालेय विद्यार्थ्यांना सायकली वाटप ठप्प

शालेय विद्यार्थ्यांना सायकली वाटप ठप्प 

ऑनलाईन टीम / बेंगळूर

 राज्य सरकारतर्फे इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सायकलींचे वितरण करण्यात येते. पण या देण्यात येणाऱया या सायकली निकृष्ठ दर्जाच्या असल्याचा आरोप काहीं संघटनांनी केला होता. त्यामुळे यंदा वाटप करण्यात येणाऱया या सायकली वाटप तुर्तास ठप्पकरण्यात आला आहे. वाटप करण्यात येणाऱया या सायकलींचा दर्जा तपासुन त्यानंतर या सायकल वाटप करण्याचे ठरविण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांचे उपायुक्त व जिल्हापंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी यांच्या नुकत्याच झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण या सर्वांचा परिणाम मात्र विद्यार्थ्यांवर होत आहे. कारण सायकलींचा दर्जा तपासणी केव्हा व कधीपर्यंत करून त्याचा निर्णय कधी जाहीर होणार याबाबत कधी करवाई करण्यात येईल असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.

Related posts: