|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » मराठी भाषा टिकविण्यासाठीचे प्रयत्न अपुरे : ज्येष्ठ कवयित्री क्रांती साडेकर

मराठी भाषा टिकविण्यासाठीचे प्रयत्न अपुरे : ज्येष्ठ कवयित्री क्रांती साडेकर 

ऑनलाईन टीम / पुणे :

इतर भाषिक साहित्यकांना त्यांच्या त्यांच्या भाषेतील गोडवा माहित असल्यामुळे त्या भाषा टिकवून ठेवण्यासाठी साहित्यकि वर्तुळांमधून मोठय़ प्रमाणात प्रयत्न केले जातात. तर याउलट आपल्याकडे त्याप्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाही. मराठी भाषा टिकविण्यासाठीचे प्रयत्न अपुरे आहेत, असे मत ज्ये÷ कवयित्री क्रांति साडेकर यांनी व्यक्त केले.

येथील सृजन कलामंच आणि कविता रसिक मंडळीतर्फे आज ज्ये÷ कवयित्री क्रांति साडेकर यांना डॉ. नलिनी साधले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. रुपये दहा हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर शालिनी पटवर्धन, शुभदा पराडकर, सतीश पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना क्रांति साडेकर म्हणाल्या की, आमच्या पिढचे शिक्षण वृत्तबंधीय कवितामय वातावरणात झाले. शाळेतला पहिला तास भाषेचाच असायचा आणि पाठ असलेल्या सगळय़ा कवितांचे सामुहिक पठण व्हायचे. वृत्तबंधीय कविता लिहिताना एखादा शब्द अडला आहे, असे फार क्वचित व्हायचे. जुळवून किंवा ओढून-ताणून कविता लिहीली जायची नाही. मुक्तछंद कविता लिहिताना तुमच्याकडे प्रचंड शब्दसंग्रह असणे आवश्यक आहे. अलीकडे पाठ्यक्रमांमध्ये समाविष्ट असलेल्या कवितांमध्ये वृत्तछंदाचा अभाव असल्यामुळे त्या कविता मुलांना शिकविणे शिक्षकांसाठी अवघड झाले आहे. पूर्वीच्या साहित्यकांनी मराठी भाषेतील गद्य-पद्य प्रकारात विपूल लेखन केले आहे, तो वारसा पुढे नेण्याची आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे.

यावेळी बोलताना भूषण कटककर म्हणाले, शाळेत वृत्त छंदातल्या कविता होत्या, त्यामुळ त्या गुणगुणता यायच्या. चित्रपटगीते, गझल, स्तोत्र ही देखील वृत्तातच बांधलेली असल्यामुळे त्याला एक लय असायची. त्यामुळेे ती लक्षात रहायची. परंतु, आज वृत्त बंधात कविता बांधणाऱया कवींना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार द्यावा लागतो, ही चिंतेची बाब आहे. मुक्त छंद कविता प्रकाराला आशय असला, तरी त्याला लय नसते. मुक्तछंदाचा प्रवाह वृत्तबंधीय कवितेला मारक ठरत आहे. कवितेचे वृत्तबद्ध रूपडे हरवत चालले आहे. वृत्तबंधीय कविता साहित्यातून नामशेष होत असल्याने साहित्यातील एक प्रकार काळाच्या पडद्याआड होत चालला आहे. वृत्तबंधीय कवींना आणि कवितांना संजीवनी मिळणे आवश्यक असून हरवत चाललेला हा साहित्य प्रवाह पुनर्जिवीत झाला पाहिजे. पुरस्कार वितरण सोहळय़ानंतर झालेल्या मराठी गझल मुशायऱयामध्ये भूषण कटककर, क्रांती साडेकर, मिलिंद छत्रे, प्राजक्ता पटवर्धन, रणजित पराडकर, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी सहभागी झाले होते. यावेळी स्प्रिया जाधव, वंदना लोखंडे उपस्थित होत्या.

 

Related posts: