|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोर्तिम, सांतोमे भागातील नळ दोन दिवसांपासून कोरडे

कोर्तिम, सांतोमे भागातील नळ दोन दिवसांपासून कोरडे 

वार्ताहर/ पणजी

कोर्तिन, सांतोमे, 31 जानेवारी रस्ता परिसरामधील घरांच्या नळांना गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने रहिवाश्यांचे बरेच हाल झाले आहेत. चर्च ते कोर्तिनपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे रेंगाळल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर आजारी असल्यामुळे येथील रहिवाशांना कोणीच वाली राहिलेला नाही. त्याचा परिणाम येथील लोकांच्या मूलभूत गरजांवर होत आहे. चर्च ते कोर्तिनपर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी चर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पाईपलाईनसाठी खोदकाम सुरु असताना पाणी पुरवठा करणारा एक वॉल अडथळा ठरु लागल्याने तो बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खाते व पाणी विभागाचे कर्मचारी गेले दोन दिवस जुना वॉल बदलण्याचे काम करत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. त्याचा फटका वरील भागातील घरांना तसेच मळा भागातील काही घरांना बसला आहे. त्यांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नसल्याने हाल झाले आहेत.

जुना वॉल काढल्यानंतर नवीन वॉल बसविण्याचे कामाला सुरुवात झाली आहे. हे काम दिवसेंदिवस रेंगाळत असल्याने लोकांचे हाल वाढतच आहेत. पाणी विभागाच्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेऊन या भागात लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

पाईपलाईन, संरक्षक भिंतीच्या कामामुळे वाहतूक कोंडी

दरम्यान, चर्च ते कोर्तिनपर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी फुटपाथवर चरी खोदले आहे तसेच फुटपाथवर मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे चालत जाणाऱयांना रस्त्यावरुन जावे लागत असल्याने वाहतुकीची समस्या वाढत आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आल्तीनो (लिसेव) येथे संरक्षक भिंत उभारण्याचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबर लोकांना सध्या चर्च परिसरातून जाताना बराच वेळा वाया जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांनी त्वरित फुटपाथ दुरुस्त करुन लोकांना जाण्यासाठी वाट करण्याची मागणी होत आहे.

 

Related posts: