|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » राज्यात हवामान बदलले,दोन दिवसात पावसाची शक्यता

राज्यात हवामान बदलले,दोन दिवसात पावसाची शक्यता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे चिन्ह आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व-विदर्भात 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे. यामुळे अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिह्यात ढगाळ वातावरण राहील.

याचबरोबर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिह्यांतील काही भागात या दरम्यान पावसाची शक्मयता असल्याचे मत हवामान तज्ञांनी वर्तविले आहे. या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुके राहील आणि कमाल तापमानात घट होईल. राज्यातील इतर भागात 15 ते 17 डिसेंबर रोजी काही प्रमाणात आभाळी वातावरण राहील. पूर्व-विदर्भातील शेतकऱयांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Related posts: