|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » 1984 शीख विरोधी दंगल प्रकरण ; काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी

1984 शीख विरोधी दंगल प्रकरण ; काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उच्च न्यायालयानं  दिलेला निर्णय बदलत काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं आहे. कुमार यांना शीख विरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. मात्र हत्या प्रकरणात कुमार यांची मुक्तता झाली आहे.

दंगल भडकावणे आणि कटकारस्थान रचणे या गुन्हय़ांसाठी सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत न्यायालयाला शरण यावं लागेल. ’1947 च्या उन्हाळय़ात फाळणीदरम्यान कित्येक लोकांची कत्तल करण्यात आली. 37 वर्षांनंतर दिल्लीतही अशीच घटना घडली. आरोपी राजकीय संरक्षणाचा फायदा घेत सुनावणीतून सहीसलामत सुटले,’ अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि न्यायमूर्ती विनोद गोयल यांनी निकालपत्राचं वाचन केलं. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये आज काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा निकाल आल्याने काँग्रेस पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

 

Related posts: